Fri, Jul 19, 2019 17:45होमपेज › Konkan › स्थानिकांच्या विरोधाला सेनेचे बळ

स्थानिकांच्या विरोधाला सेनेचे बळ

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

रत्नागिरी : प्रतिनिधी

रिफायनरी प्रकल्पामुळे नाणार आणि जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पामुळे नाणारनजीकचा परिसर तापत चालला आहे. रिफायनरीला होणार्‍या स्थानिकांच्या विरोधाला शिवसेना बळ देत आहे. दुसरीकडे शिवसेनेला जमेल तितका विरोध करुन राजकीयद‍ृष्ट्या नामोहरम करण्याचा डाव भाजप कोकणातही खेळू पाहत आहे. त्यामुळे रिफायनरीला विरोध हा भाजपला रोखण्याचा मुद्दा शिवसेना करीत आहे.

रिफायनरी प्रकल्पामुळे नाणार आणि जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पामुळे नाणारनजीकचा परिसर तापत चालला आहे. रिफायनरीला होणार्‍या स्थानिकांच्या विरोधाला शिवसेना बळ देत आहे. शिवसेनेला जमेल तेथे आडवे जाऊन राजकीयद‍ृष्ट्या नामोहरम करण्याचा डाव भाजप कोकणातही खेळू पाहत आहे.  उद्योगमंत्री देसाई शिवसेनेचे, युती सरकारमध्ये शिवसेना सामील, रिफायनरीचा निर्णय सरकारचा, अशा सर्व स्थितीत आता त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न शिवसेनेचा सुरू आहे. शिवसेनेचे मंत्री राजीनामे खिशात घेऊन वावरत असले तरी ते खिशातून कधीही बाहेर पडत नाहीत, हे लक्षात आल्यावर भाजपने  आता त्यांच्यावर दबाव वाढवला आहे. त्याला विरोध करण्यासाठी शिवसेनेकडेही पुरेसा दारूगोळा नाही. त्यामुळे आधी जैतापूर आणि आता रिफायनरीविरोधात राजकीय संघर्ष सुरू आहे.  राजापूर तालुक्यातील नाणार रिफायनरी प्रकल्पाचे रण तापण्याला ही सारी पार्श्‍वभूमी आहे. 

राजकीयद‍ृष्ट्या अत्यंत संवेदनशील ठरणारे प्रकल्प, उदा. एन्‍रॉन, स्टरलाईट कारखाना, जैतापूर  अणुऊर्जा प्रकल्प आणि आता रिफायनरी कोकणात येऊ घातली आहे. तिला दोन स्तरांवर विरोध आहे. स्थानिकांचा विरोध हा आत्यंतिक दुबळा आणि भावनिक होता. आंतरराष्ट्रीय पातळीपासून स्थानिक पातळीपर्यंत पर्यावरणवादी आणि सोयीस्करपणे भूमिका बदलून विरोध करणारे राजकीय पक्ष असे चित्र आहे. रिफायनरी या परिसरात धोकादायक आहे, पर्यावरणाला हानिकारक आहे, या मुद्यावरच आता शिवसेना स्थानिकांच्या प्रकल्प विरोधाला बळ देते आहे.

लोकांचे नेतृत्व करून रिफायनरी योग्य कशी ठरू शकते, विकासासाठी उपयुक्त कशी ठरू शकते, हे त्यांच्या गळी उतरवणारा लोकनेता शिवसेनेकडे नाही. तसा तो भाजपकडेही नाही. भाजपच्या दमन नीतीला विरोध करायला रिफायनरीचा मुद्दा मिळाला त्यातच लोकभावना तीव्र होत गेली आहे.रिफायनरीविरोधात मुंबईतील आझाद मैदानावरील प्रकल्पग्रस्तांचे पक्षरहित आंदोलन या संदर्भातील विरोध किती तीव्र आहे, हे दाखवून देणारे ठरले. हा विरोध पाहून ‘प्रकल्प लादला जाणार नाही’, असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे कोकण रिफायनरीविरोधी संघर्ष संघटनेचे अशोक वालम यांनी सांगून त्याला आणखी एक आयाम दिला आहे. 

शिवसेना वालम यांच्यापेक्षा वेगळे आंदोलन लढवू इच्छिते. अशा वेळी बालेकिल्ला असलेल्या या भागात लोकांना समजावण्यापेक्षा लोकांमागून जाणे आणि भावना भडकावून भाजपची कोंडी करणे शिवसेनेला सोपे वाटले. रिफायनरीला होत असलेला विरोध यामुळे वाढत चालला आहे किंवा वाढवला जात आहे. जैतापूरविरोधात आंदोलन करण्यासाठी शिवसेनेला कार्यकर्ते जमवावे लागतात, तेथे आंदोलनाचा फज्जाच अधिक उडतो, याचा पडताळा या आधीही आला आहे. त्यामुळे रिफायनरीला विरोधाचे असलेले मूळ मुद्दे बाजूला राहिले आहेत. 

दरम्यान, नाणारचे रण आणि वर्षभरात येणार्‍या निवडणुका लक्षात घेऊन सध्या वातावरण तापले आहे. त्याचबरोबर होणार्‍या मोठ्या प्रकल्पाच्या पार्श्‍वभूमीवर हितसंबंधांच्या हालचालीही या भागात वाढल्या आहेत.

Tags : 


  •