Tue, Mar 26, 2019 21:53होमपेज › Konkan › पुरोगामी शिक्षक समितीचे चिपळुणात उद्या अधिवेशन

पुरोगामी शिक्षक समितीचे चिपळुणात उद्या अधिवेशन

Published On: Dec 16 2017 1:44AM | Last Updated: Dec 15 2017 8:45PM

बुकमार्क करा

चिपळूण : वार्ताहर

पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने 17 रोजी चिपळूण येथे त्रैवार्षिक अधिवेशन होणार आहे. यावेळी गुणवंत शिक्षकांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

शहरातील ब्राह्मण सहाय्यक संघ सभागृहात सकाळी 10.30 वा. हा कार्यक्रम होईल. यावर्षी संघटनेच्या वतीने शिक्षक, विद्यार्थी आणि शाळांना संग्रही ठेवता येईल अशी शैक्षणिक दिनदर्शिका तयार केली आहे. तालुक्यातील जि. प.च्या शाळांना ही दिनदर्शिका मोफत वितरित करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला सभापती पूजा निकम, उपसभापती शरद शिवगण, गुरुकुलचे संजय दरेकर, सहायक गटविकास अधिकारी अरुण जाधव, गटशिक्षणाधिकारी सूर्यकांत पाटील आदी उपस्थित राहणार आहेत. 

या कार्यक्रमात जि. प. आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त शिक्षक व गुणवंत शिक्षकांचा गौरव होणार आहे.  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चंद्रशेखर कोतवडेकर, जगदीश कांबळे, शशिकांत सकपाळ, शैलेश जानवलकर आदी परिश्रम घेत आहेत.