Mon, Jan 20, 2020 15:22होमपेज › Konkan › महाड : माजी उपनगराध्यक्षा प्रणाली म्हामुणकर यांचे निधन 

महाड : माजी उपनगराध्यक्षा प्रणाली म्हामुणकर यांचे निधन 

Published On: Dec 22 2017 11:08PM | Last Updated: Dec 22 2017 11:08PM

बुकमार्क करा

महाड : प्रतिनिधी

महाड शहर काँग्रेसचे अध्यक्ष नगरसेवक प्रशांत म्हामुणकर यांच्या पत्नी तथा माजी उपनगराध्यक्षा प्रणाली म्हामुणकर (वय, ४२) यांचे मुंबईतील हिंदुजा रूग्णालयात आज सायंकाळी दिर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्ताने शहरात शोककळा पसरली आहे.

प्रणाली म्हामुणकर या २००६ साली महाड नगरपरिदेवर निवडून गेल्या होत्या. अडीच वर्षे त्यांनी महाडचे उपनगराध्यक्षपद प्रभावीपणे भुषवले होते. एक अभ्यासू नगरसेविका  म्हणून त्यांनी लोकप्रियता मिळवली होती. गेल्या सहा महिन्यांपासून त्या कर्करोगाने आजारी होत्या. मुंबईतील हिंदूजा रुग्णालयात प्रणाली म्हामुणकर यांच्यावर उपचार सुरू असतानाच आज सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. शनिवारी सकाळी १० वा  त्यांच्यावर महाडमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली. माजी आमदार माणिक जगताप यांच्यासह अनेकांनी म्हामुणकर कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.