Thu, Dec 12, 2019 08:27होमपेज › Konkan › रत्नागिरी नगराध्यक्षपदाचा कार्यभार साळवींकडे

रत्नागिरी नगराध्यक्षपदाचा कार्यभार साळवींकडे

Published On: Jan 17 2019 11:44PM | Last Updated: Jan 17 2019 11:44PM
रत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

रत्नागिरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाचा कार्यभार गुरुवारपासून शिवसेनेचे उपनगराध्यक्ष प्रदीप साळवी यांच्याकडे आला आहे. दि. 17 पासून ते पुढे 87 दिवस नगराध्यक्षपद सांभाळणार आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पक्ष निर्णयानुसार नगराध्यक्ष राहुल पंडित गुरुवारपासून रजेवर गेले आहेत. शिवसेनेचे खा. विनायक राऊत हे लोकसभेचे उमेदवार असल्याने त्यांचे मुख्य निवडणूक प्रतिनिधी म्हणून नगराध्यक्ष राहुल पंडित यांना काम पाहावे लागणार आहे. गेल्या निवडणुकीचा अनुभव असल्याने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

17   जानेवारीपासून 11 एप्रिलपर्यंत असे 87 दिवसांसाठी नगराध्यक्ष पंडित रजेवर गेले आहेत. दीर्घ मुदतीची रजा असल्याने हा कार्यभार उपनगराध्यक्ष साळवी यांच्याकडे आला आहे. त्यांनी गुरूवारपासून प्रभारी नगराध्यक्ष म्हणून कामकाज सुरू केले. त्यांना सर्वपक्षीय नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांनी समक्ष भेट देऊन शुभेच्छा दिल्या.