Tue, Jul 23, 2019 16:41होमपेज › Konkan › मालवण : किल्ले सिंधुदुर्गचा ३५१ वा वर्धानदिन 

मालवण : किल्ले सिंधुदुर्गचा ३५१ वा वर्धानदिन 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मालवण : मंगेश नलावडे

शिवरायांच्या आरमाराची सागरी राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालवण समुद्रातील किल्ले सिंधुदुर्गचा ३५१ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात  साजरा करण्यात आला. यावेळी किल्ल्याचे भूमिपूजन झालेल्या मोरयाचा धोंडा याठिकाणी गणेश पूजन करण्यात आले. किल्ले सिंधुदुर्गात शिवराजेश्वर मंदिरात शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. 

मालवण येथील किल्ले सिंधुदुर्गच्या उभारणीस ३५१ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती, वायरी भूतनाथ ग्रामपंचायत आणि मालवण नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी सिंधुदुर्ग किल्ल्याचा ३५१ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. सकाळी ७ वाजता दांडी- वायरी किनाऱ्यावरील मोरयाचा धोंडा याठिकाणी वायरी सरपंच घन:श्याम ढोके यांच्याहस्ते गणेश पूजन करण्यात आले. यानंतर सिंधुदुर्ग किल्ल्यातील शिवराजेश्वर मंदिरात तहसीलदार समीर घारे यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पूजा करण्यात आली. यावेळी मंदिरात आयोजित कार्यक्रमात किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे अध्यक्ष गुरुनाथ राणे यांच्या 'सिंधुदुर्ग- प्राचीन अर्वाचीन प्रवास' या पुस्तकाचे प्रकाशन भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तहसीलदार समीर घारे, भाजप नेते अतुल रावराणे, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, किल्ले प्रेरणोत्सव समितीच्या उपाध्यक्ष ज्योती तोरसकर, भाजप तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर, नगरसेविका सेजल परब, तृप्ती मयेकर, नगरसेवक आपा लुडबे, गणेश कुशे, भाऊ सामंत, मंदिराचे पुजारी श्रीराम सकपाळ, बबलू राऊत, महेश मांजरेकर, रविकिरण आपटे, विकी तोरसकर, सूर्यकांत फणसेकर, प्राचार्य डॉ. श्रीरंग मंडले, वायरी भूतनाथ ग्रामपंचायत सदस्य आदी व इतर उपस्थित होते. 

यावेळी प्रमोद जठार यांनी शिवाजी महाराजांच्या विविध पराक्रमांची माहिती दिली. आज सिंधुदुर्ग किल्ल्याच्या देखभाल व संवर्धनासाठी शासनाकडून निधी मंजूर झाला असून लवकरच याबाबतचा आराखडा निश्चित करून कामही सुरू होईल असा विश्वास त्‍यांनी यावेळी व्यक्त केला. तहसीलदार समीर घारे यांनी मनोगत व्‍यक्‍त केले.

यानंतर शिवराजेश्वर मंदिराच्या परिसरात न्यू शिवाजी ब्रिगेड, कोल्हापूर यांच्या पथकाने विविध चित्तथरारक मर्दानी खेळ सादर करत शिवरायांना सलामी दिली. यावेळी शिवप्रेमी नागरिक व पर्यटकांनी गर्दी केली होती. सूत्रसंचालन ज्योती तोरसकर यांनी केल.


  •