Mon, Mar 25, 2019 13:15होमपेज › Konkan › रायगडवर दगड मानेवर पडून युवक ठार

रायगडवर दगड मानेवर पडून युवक ठार

Published On: Jun 06 2018 10:00PM | Last Updated: Jun 06 2018 10:00PMरायगड : पुढारी ऑनलाईन 

रायगड येथे शिवराज्याभिषकासाठी आलेल्या बरडतरी हनुमंत वारे (वय १८, बरामपूर ता. भूम, जि. उस्मानबाद) याचा हिरकणी बुरुजाजवळ मानेवर दगड पडून मृत्यू झाला.  

यावेळी हर्शल विजयराव पराते (रा. महाला, जि. नागपूर) हे ही पायऱ्या उतरताना  किरकोळ जखमी झाले आहेत. अमित संपत महागरे (वय २४ रा. नार खेड शिवापूर, ता. हवेली जि. पुणे) किरकोळ जखमी आहेत. जखमींवर महाड ग्रामीण रुगणालायत उपचार सुरू आहेत.