Mon, Sep 24, 2018 17:28होमपेज › Konkan › पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांनी विनयभंग केल्याची फिर्याद

पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांनी विनयभंग केल्याची फिर्याद

Published On: Dec 08 2017 1:40AM | Last Updated: Dec 07 2017 10:03PM

बुकमार्क करा

कुडाळ : वार्ताहर

कोणतीही परवानगी नसताना घरात घुसून पावशी येथील महिलेला कुडाळमधील दोन पोलिस अधिकारी व चार पोलिसांनी विनयभंग केल्याची खासगी फिर्याद पावशीतील महिलेच्या पतीने कुडाळ न्यायालयात दाखल केली आहे, अशी माहिती अ‍ॅड. राजीव बिले यांनी दिली आहे. 

हे पोलिस अधिकारी व पोलिस 5 ऑगस्ट 2017 रोजी महिलेच्या घरात घुुसले. ही महिला घरी एकटीच होती.  महिला झोपलेल्या खोलीत जाऊन तिला अश्‍लिल शिवीगाळ करून तिच्या चारित्र्याची अवहेलना केली. तसेच या पोलिस अधिकार्‍यांनी तुम्ही कसला घाणेरडा धंदा करता?  असा सवाल करत एकेकाला तुरूंगात डांबणार असे सांगत शिवीगाळ करून तिला दमदाटी केली.  ही घटना फिर्यादीच्या नोकरांनीही पाहिली होती. महिलेने ही घटना पतीला सांगितल्यानंतर पतीने 7 ऑगस्ट 2017 रोजी पोलिस अधीक्षक कार्यालयात तक्रार दाखल केली. मात्र, कोणतीही कार्यवाही न केल्याने पतीने कुडाळ पोलिस स्टेशन येथे याबाबत लेखी फिर्याद दिली. ही फिर्याद पोलिसांनी दाखल करून घेतली आहे.