होमपेज › Konkan › जालगाव येथे अपघातात पोलिसाचा मृत्यू

जालगाव येथे अपघातात पोलिसाचा मृत्यू

Published On: Apr 08 2018 2:12AM | Last Updated: Apr 08 2018 12:55AMदापोली : वार्ताहर

रत्नागिरी येथे पोलिस भरती परीक्षेच्या बंदोबस्तासाठी जाणार्‍या पोलिस कर्मचार्‍यांच्या दुचाकीला दापोली-दाभोळ मार्गावर जालगावयेथे शनिवारी सकाळी अपघात झाला. यामध्ये कमलाकर प्रकाश शेकरे (वय 29, मूळचे गळवड - नाशिक) यांचा मृत्यू झाला. 

दापोली पोलिस ठाण्यातून कमलाकर प्रकाश शेकरे (29) व उदय यशवंत मोनये (26) हे दोन कर्मचारी दुचाकीवरून दाभोळमार्गे रत्नागिरीकडे जात होते. कमलाकर शेकरे हे दुचाकी चालवत होते. जालगाव ग्रा.पं.नजीक समोरून येणार्‍या डंपरल धडकली. यात कमलाकर शेकरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर मोनये जखमी झाले. अपघातानंतर कमलाकर शेकरे यांना दापोली उपजिल्हा रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. मोनये यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची खबर डंपर चालक तुषार गुरव यांनी दापोली पोलिस ठाण्यात दिली. कमलाकर शेकरे हे मूळचे सुरगणा (जि. नाशिक) तालुक्यातील गळवड गावातील आहेत. ते एकुलते एक आहेत.