Tue, Apr 23, 2019 19:32होमपेज › Konkan › कशेडी घाटात टँकर दीडशे फूट दरीत कोसळला,चालक, क्लिनर जखमी

कशेडी घाटात टँकर दीडशे फूट दरीत कोसळला,चालक, क्लिनर जखमी

Published On: Jun 27 2018 6:22PM | Last Updated: Jun 27 2018 6:22PMपोलादपूर : प्रतिनिधी 

मुबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात सुमारे दीडशे फूट खोल दरीत टँकर कोसळल्याची घटना बुधवार रोजी दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास पार्टेवाडी गावच्या हद्दीत घडली. या अपघातात चालक,क्लिनर जखमी झाले आहेत, मात्र सुदैवाने जीवित हानी टळली आहे

याबाबत कशेडी महामार्ग पोलीस सूत्राकडून मिळालेल्‍या माहितीनुसार, टँकर चालक निरंजन सुनील सरकार (वय ३६) रा नांगलवाडी ता महाड हा आपल्या ताब्यातील टँकर क्रमांक एम एच ०६ के ४८४५ घेऊन इचलकरंजी ते महाड असा जात होता. कशेडी घाटात पार्टेवाडी हद्दीत एका अवघड वळणावर गाडीवरील ताबा सुटून टँकर सुमारे १५० फूट खोल दरीत कोसळला. या अपघातात चालक निरंजन व क्लिनर संतोष शांताराम दरेकर (वय ४५) रा कशेडी ता खेड जि रत्नागिरी हे दोघे जखमी झाले आहेत तर क्लिनर दरेकर याच्या डोक्याला मार लागून गंभीर दुखापत झाली आहे 

या घटनेची माहिती समजताच कशेडी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी मधुकर गमरे, पो हा सुरज चव्हाण, ए एन तडवी, एन बी तडवी, एस एम कुर्डूनकर व पोलीस मित्र महेश रांगडे यांनी घटना स्थळी धाव घेऊन मदत कार्य केले. जखमी चालक, क्लिनर याना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचारा साठी दाखल केले या अपघाताची नोंद पोलादपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे