Thu, Apr 25, 2019 06:25होमपेज › Konkan › कशेडी घाटात कंटेनर उलटला, सुदैवाने जीवित हानी टळली

कशेडी घाटात कंटेनर उलटला, सुदैवाने जीवित हानी टळली

Published On: Jul 28 2018 2:17PM | Last Updated: Jul 28 2018 1:08PMपोलादपूर ( सातारा ) : प्रतिनिधी  

मुबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात एका अवघड वळणावर चालकाचे नियंत्रण सुटून कंटेनर पलटी झाल्याची घटना शनिवार रोजी सकाळी ११ च्या सुमारास भोगाव हद्दीत घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी  की , कंटेनर चालक अरुणकुमार शेरावत (वय-५०)राहणार गोवा, हा कंटेनर क्रमांक आर जे ५१ जी ऐ ० ७१२ घेऊन गोव्यावरुन अहमदनगरकडे जात होता. कशेडी घाटात भोगाव हद्दीत एका अवघड वळणावर वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर पलटी झाला. मात्र सुदैवाने चालक बचावला आहे मात्र वाहनांचे नुकसान झाले.

या अपघाताची माहिती मिळताच कशेडी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी मधुकर गमरे यांनी पोलिस कर्मचाऱ्या सह घटनास्थळी धाव घेतली.