Thu, Jul 18, 2019 02:29होमपेज › Konkan › ...तोपर्यंत प्लास्टिक पिशवी विरोधी मोहीम थांबवा

...तोपर्यंत प्लास्टिक पिशवी विरोधी मोहीम थांबवा

Published On: Jan 23 2018 10:24PM | Last Updated: Jan 23 2018 9:42PMकणकवली : शहर वार्ताहर  

कणकवली नगरपंचायतीच्यावतीने शहरात प्लास्टिक पिशव्यांविरोधात धडक कारवाई सुरू करण्यात आली.  या अंतर्गत रविवारी व सोमवारी अनेक व्यापार्‍यांच्या दुकानांवर न. पं. च्या पथकाने धाडी टाकत कित्येक किलो  प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या. यामुळे व्यापारी व न. पं. प्रशासनात वाद निर्माण झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर स्वाभिमानचे शहर अध्यक्ष नगरसेवक समीर नलावडे व कार्यकर्त्यांनी मंगळवारी यांनी  न. पं. मुख्याधिकार्‍यांची भेट घेवून शासनाचा प्लास्टिक बंदीचा निर्णय होईपर्यंत ही मोहीम थांबवावी अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे केली. 

प्लास्टीक पिशव्यांना पर्याय व्यापार्‍यांनीच उपलब्ध करावयाचा आहे. नगरपंचायत कोणताही पर्याय देणार नाही. तसेच यापुढे जे व्यापारी 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या बाळगतील, त्यांच्यावर कडक कारवाईच सुरूच ठेवणार असल्याचा इशारा मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी व्यापार्‍यांना सोमवारी दिला होता. हा निर्णय व्यापार्‍यांच्या हिताचा नसल्याचे सांगत स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी व्यापार्‍यांची भूमिका मुख्याधिकार्‍यांसमोर मांडली. एप्रिल- 2018 मध्ये महाराष्ट्र शासन राज्यात प्लास्टिक बंदीचा निर्णय जाहीर करणार आहे.

तोपर्यंत आपण शहरातील विक्रेत्यांना व व्यापार्‍यांना प्लास्टिक बंदी साठी त्रास देवू नये, असे आवाहन त्यांनी या निवेदनाद्वारे केले आहे. व्यापार्‍यांशी चर्चेवेळी आपणाकडून देण्यात आलेली वागणूक चुकीची असल्याचे समीर नलावडे यांनी  सांगत नाराजी व्यक्‍त केली. अभिजित मुसळे, गौतम खुडकर, संदीप नलावडे, महेश शिरसाट, अमोल पारकर, संदीप राणे आदी उपस्थित होते.