Tue, Jun 18, 2019 22:19होमपेज › Konkan › प्रति रुग्ण ९९९ रुपये

प्रति रुग्ण ९९९ रुपये

Published On: Jan 12 2018 1:53AM | Last Updated: Jan 11 2018 10:48PM

बुकमार्क करा

सावंतवाडी : प्रतिनिधी  

विविध कधीही व कोणीही न ऐकलेल्या तपासण्यांच्या नावाखाली प्रति रुग्ण रु. ९९९ उकळण्याच्या तयारीत ही आयोजक मंडळी होती. या आयोजकांचे दावे वैद्यकीय शास्त्रात न बसणारे व अजिरंजित असल्याने  आयएमए  तसेच सावंतवाडी मेडिकल असोसिएशन  यांनी एकत्रितरित्या प्रशासनाच्या विविध यंत्रणांना या शिबिराच्या बोगसपणाबद्दल निवेदने देऊन व आक्षेप नोंदवून  हे शिबिर बंद पाडले.

गुरुवारी सकाळी सावंतवाडीमधील सर्व पॅथीचे डॉक्टर्स, प्रशासकीय यंत्रणा,पोलिस अधिकारी व कर्मचारी शिबिर स्थळ असलेल्या  श्रीराम वाचन मंदिर येथे पोहोचले व या शिबिराचे प्रमुख डॉ. भाग्येश कुलकर्णी यांना जाब विचारला असता त्यांनी कॉर्पोरेट पध्दतीने शिबिरातील तपासणी व चाचण्या कशा कायदेशीर आहेत वगैरे सांगण्यास सुरुवात केली. पण जेेव्हा आयएमए पदाधिकारी डॉ. जयेंद्र परूळेकर, सावंतवाडी मेडिकल असो. चे अध्यक्ष डॉ. राजेश नवांगूळ व ह्रदयरोग तज्ज्ञ डॉ. शंतनू तेंडूलकर यांनी विविध प्रश्‍न विचारण्यास सुरुवात केली तेव्हा डॉ. कुलकर्णी यांची भंबेरी उडाली.

राज्य आयएमए तसेच राज्य आरोग्य परिषदकडे तुमची तक्रार करण्यात येईल व तुमचे रजिस्ट्ररेशन रद्द करण्यासाठी संघटनेतर्फे आग्रही मागणी करण्यात येईल, हे सांगितल्यावर डॉ. भाग्येश कुलकर्णी याने सर्व रुग्णांची व उपस्थित डॉक्टरांची माफी मागितली.  पुन्हा जिल्ह्यात असली शिबिरे आयोजित करण्यात येणार नाहीत, अशी कबुली दिली. तसेच शनिवारी पर्वरी गोवा येथील शिबिर देखील रद्द करणार असल्याचे सांगितले. डॉक्टर संघटनेच्या आग्रही भूमिकेमुळे लांबून आलेल्या काही रुग्णांची येणे जाण्याची भाडेरक्कम देखील डॉ. कुलकर्णी यांनी दिली.