Mon, Jan 21, 2019 19:45होमपेज › Konkan › नदी पुनर्जीवनासाठी सरसावले अनेक हात

नदी पुनर्जीवनासाठी सरसावले अनेक हात

Published On: May 21 2018 1:18AM | Last Updated: May 21 2018 1:18AMरत्नागिरी : प्रतिनिधी

परटवणे येथील नदी स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ रविवारी सकाळी करण्यात आला. ही नदी पुनरुज्जीवित करण्यासाठी शहरातील अनेकांचे हात सरसावले असून, ही मोहीम यशस्वी होईल, असा विश्‍वास या मोहिमेचे प्रणेते साईल शिवलकर आणि ओमकार गिरकर यांनी व्यक्‍त केला आहे. 

मारुती मंदिर येथून वाहणारा सांडपाण्याच्या नाला फणशी येथे या नदीत मिसळत असल्याने या नदीचे पाणी दुषित झाले आहे. तसचे नदीचे पात्र गाळाने भरले आहे. या नदीची स्वच्छता करून या नदीला पुनर्जीवन प्राप्त करून देण्यासाठी साईल शिवलकर, ओमकार गिरकर आणि पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे. 

या नदीची स्वच्छता करण्याबरोबरच ाल्याचे काँक्रिटीकरण करणे, नाल्यातील दगड माती काढून पाणी वाहून जाण्यास मार्ग तयार करणे, नदी मुखाशी साचलेला गाळ काढणे, बंधार्‍याला गेट बसवणे आदी कामे करण्यात येणार आहेत. याचा शुभारंभ रविवारी सकाळी करण्यात आला. 

या मोहिमेत नागरिकांचा सहभाग वाढत असून, रविवारी शुभारंभावेळी नितीन कानविंदे, भैया वणजू, सिद्धेश धुळप, सचिन शिंदे आदींनी नाल्याची साफसफाई केली. पुढील 15 दिवस ही मोहिम सुरू राहणार असून, नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन साईल शिवलकर आणि ओमकार गिरकर यांनी केले आहे.