Sat, Jan 19, 2019 16:15होमपेज › Konkan › वेंगुर्लेत पालकमंत्र्यांना दाखविले काळे झेंडे!

वेंगुर्लेत पालकमंत्र्यांना दाखविले काळे झेंडे!

Published On: Mar 10 2018 11:02PM | Last Updated: Mar 10 2018 11:00PMवेंगुर्ले : प्रतिनिधी 

वेंगुर्ले येथे शनिवारी आलेले पालकमंत्री ना. दीपक केसकर वाळू व्यावसायिकांकडे पाठ फिरवून निघून गेले. त्याच्या निषेधार्थ वाळू व्यावसायिकांनी त्यांना काळे झेंडे दाखविले. याप्रकरणी पोलिसांनी 13 वाळू व्यावसायिकांंना  ताब्यात घेत गुन्हे दाखल केले. 

वेंगुर्ले तालुक्यातील अणसूर, मोचेमाड खाडीतील वाळू उपसा टेंडर पद्धतीने लिलावात घेऊन शासनाला 3 कोटी रुपयांचा महसूल देऊ केला आहे. मेरी टाईम बोर्डाच्या परवानगीने  केल्या जाणार्‍या वाळू उपसाबाबत गोव्यातील उद्योगपतीने न्यायालयात हरकत घेतली आहे. त्याला न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली. अणसूर व मोचेमाड गावातील वाळू व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे, अशी माहिती 50 ते 60 वाळू व्यावसायिकांनी दिली.संपूर्ण जिल्ह्यात एकमेव मोचेमाड खाडीतील वाळू उपशाला विरोध केला गेला आहे. याचा फटका वाळू व्यवसायिकांना बसला आहे.