Sun, Mar 24, 2019 08:26होमपेज › Konkan › जिल्ह्यातील देवस्थान संदर्भातील प्रलंबित प्रश्‍न सुटणार 

जिल्ह्यातील देवस्थान संदर्भातील प्रलंबित प्रश्‍न सुटणार 

Published On: Dec 03 2017 1:07AM | Last Updated: Dec 02 2017 10:04PM

बुकमार्क करा

कणकवली : प्रतिनिधी

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती, कोल्हापूरचे अध्यक्ष महेश जाधव यांची भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अतुल काळसेकर यांनी  पदाधिकार्‍यांसमवेत कोल्हापूर येथे देवस्थान कार्यालयात भेट घेतली. यावेळी त्यांनी सिंधुदुर्गातील देवस्थान संबंधी विविध प्रलंबित प्रश्‍नांबाबत तोडगा काढण्याची मागणी केली. प.महाराष्ट्र देवस्थान समितीला पूर्णवेळ अध्यक्ष वेळ मिळाल्याने जिल्हावासीयांच्या देवस्थान संदर्भातील प्रलंबित प्रश्‍नांची तड लागेल, असा विश्‍वास अतुल काळसेकर यांनी या बैठकीनंतर व्यक्त केला.

यावेळी त्यांच्यासोबत भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, भाजपा कुडाळ तालुकाध्यक्ष चारूदत्त देसाई युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस अभिषेक चव्हाण आदी उपस्थित होते. गेली सुमारे दहा वर्षे जिल्हाधिकारी कोल्हापुर यांच्या अध्यक्षतेखाली चालणार्‍या या देवस्थान समितीला महेश जाधव यांच्या रुपाने पुर्णवेळ अध्यक्ष मिळालेला आहे. महेश जाधव यांनी सिंधुदुर्ग जिल्हा दौर्‍यावर येऊन जिल्ह्यातील देवस्थाने सुरळीत चालावीत यासाठी मार्गदर्शन करण्यासंदर्भात तसेच जिल्ह्यातील सर्व देवस्थानांना टप्याटप्याने भेटी देण्यासंदर्भात अतुल काळसेकर यांनी विनंती केली. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सदर व्यवस्थापन समितीच्या अधिपत्याखाली जिल्ह्यातील  199 देवस्थाने येतात.छोट्या मोठ्या गैरसमजुती, कायद्यातील अज्ञान, अशा वेगवेगळ्या कारणांमुळे अनेक देवस्थान उपसमित्यामध्ये वादविवाद चालू आहेत. त्यावर कायदेशीर तोडगा काढण्यासाठी महेश जाधव यांनी जातीने लक्ष घालावा अशी आग्रहची मागणी काळसेकर यांनी केली आणि या विषयाचे गांभीर्य लक्षात घेत महेश जाधव यांनी 22/23 डिसेंबरच्या दरम्यान जिल्ह्यात येण्याचे आश्‍वासन यावेळी दिले. या दौर्‍या दरम्यान सर्वच देवस्थान समित्यांच्या पदाधिकार्‍यांसोबत संवाद साधण्याची ग्वाही त्यांनी दिली. 

शनिवारी नेरूर, वेतोरा आदी गावातील उपसमित्यांच्या पदाधिकार्‍यांनी अतुल काळसेकर यांच्या नेतृत्वाखाली महेश जाधवांसमोर आपल्या समस्या मांडल्या. या संदर्भात तोडगा काढत आतापर्यंत आलेल्या तक्रार अर्जांवर तातडीने कार्यवाही करत अहवाल सादर करण्याचे निर्देश आस्थापनाला दिले.

या चर्चेदरम्यान अतुल काळसेकर यांनी महेश जाधव यांचे आणखी एका महत्वाच्या विषयाकडे लक्ष वेधले .मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणादरम्यान होणार्‍या जमीन संपादनात काही देवस्थानांच्या जमिनी संपादित होत आहेत, त्यांमध्ये देवस्थान समिती 40% आणि कुळांना 60% नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक खातेदारांना  देवस्थान समितीचा नाहरकत दाखल आवश्यक असणार आहे, तो  गावातील सर्वच कुळांना मिळून एकच देता येईल का यावर विचार करावा, अशी मागणी केली.