Sun, Feb 17, 2019 17:32होमपेज › Konkan › रत्‍नागिरी : पेढे, परशुराम ग्रामस्‍थांचा प्रांत कार्यालयावर मोर्चा (video)  

रत्‍नागिरी : पेढे, परशुराम ग्रामस्‍थांचा प्रांत कार्यालयावर मोर्चा (video)

Published On: Jul 02 2018 2:34PM | Last Updated: Jul 02 2018 2:33PMगिमवी (रत्‍नागिरी) : प्रतिनिधी

सातबारा उताऱ्यावर असलेल्या परशुराम देवस्थानच्या नावामुळे पेढे,  परशुराम या दोन गावांतील ग्रामस्‍थांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं आहे. घर बांधता येत नाही, बँक कर्ज देत नाही, प्रकल्पग्रस्तांना या वादामुळे नोकरी मिळत नाही, अशा अनंत अडचणींना सामोरं जावं लागतं आहे.  त्यामुळे सातबारा कोरा व्हावा, संपादित जमिनीचा १०० टक्के मोबद्‍दला कुळांना मिळावा,  या मागणीसाठी   ग्रामस्‍थांनी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला.

 परशुराम देवस्थानापासून या मोर्चाला सुरुवात झाली. आणि बाजापेठेतून हा मोर्चा प्रांत कार्यालयावर धडकला. जवळपास चार हजार गावकरी या जनआक्रोश मोर्चात सहभागी झाले होते. 

देवस्थान इनामप्रश्‍नी अनेकदा गावकऱ्यांनी आवाज उठवला. मात्र आजपर्यंत त्यांच्या या प्रश्नाकडे कुणी लक्षच दिले नाही. त्यामुळे संघर्ष समितीने आंदोलनात्मक आणि न्यायालयीन लढा सुरू केला असून पुढील निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चात आमदार सदानंद चव्‍हाण तसेच विविध राजकीय पक्षांचे नेते कार्यकर्ते सहभागी झाले होते.