Wed, Apr 24, 2019 12:02होमपेज › Konkan › पालकांनीही मुलांसोबत खेळल्यास आत्मियता वाढेल

पालकांनीही मुलांसोबत खेळल्यास आत्मियता वाढेल

Published On: Jan 11 2018 1:07AM | Last Updated: Jan 10 2018 10:27PM

बुकमार्क करा
 

नांदगाव : वार्ताहर

मुलांच्या शारीरिक वाढीसाठी मैदानी खेळ महत्त्वाचे आहेत. त्यासाठी मुलांसोबत पालकांनीही खेळात सहभागी व्हायला हवे. त्यामुळे मुलांमध्ये खेळाविषयी आत्मियता वाढीस लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी  शिक्षकांबरोबर पालकांनीही शिक्षणासाठी मेहनत घेतली पाहिजे. तरच ग्रामीण भागातील मुले उच्च पदावर गेलेली दिसणार आहेत. या महोत्सवातून कणकवली तालुक्यातील विद्यार्थ्यांनी दर्जेदार खेळ करत जिल्हास्तरावर चमकदार कामगिरी करावी असे आवाहन  जि.प.अध्यक्षा सौ.रेश्मा सावंत यांनी केले.

आयनल मणेरीवाडी जि. प. शाळा येथे आयोजित कणकवली तालुकास्तरीय  शालेय बाल, क्रिडा व ज्ञानी मी होणार महोत्सवाचे उद्घाटन  सौ.रेश्मा सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. जि. प. महिला व बालकल्याण सभापती सौ.सायली सावंत, कणकवलीच्या सभापती सौ. भाग्यलक्ष्मी साटम, उपसभापती दिलीप तळेकर, गटविकास अधिकारी मनोज भोसले,गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर, आयनल सरपंच बापू फाटक, उपसरपंच लक्ष्मीकांत पेडणेकर, माजी उपसभापती संतोष कानडे, बाबासाहेब वर्देकर, पं.स.सदस्य प्रकाश पारकर, हर्षदा वाळके, मनोज रावराणे, मिलिंद मेस्त्री, गणेश तांबे, मंगेश सांवत, तृप्ती माळवदे, राधीका सावंत, दिव्या पेडणेकर, सुचिता दळवी, स्मिता माडलीकर, सुजाता हळदिवे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुशांत चव्हाण, विस्तार अधिकारी सुहास पाताडे, सुर्यकांत वायंगणकर, श्री.वडर, तंटामुक्त समिती अध्यक्ष भालचंद्र साटम, पोलिस पाटील दिलीप साटम, तालुक्यातील सरपंच, उपसरपंच,केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक व विदयार्थी उपस्थित होते.

 सौै. रेश्मा सावंत म्हणाल्या, जिल्हा परीषदेच्या वतीने घेण्यात येणार्‍या या महोत्सवासाठी सध्या मिळणारा निधी हा कमी आहे. मात्र बजेटमध्ये हा निधी वाढवण्याच्या तरतूदीसाठी आपण प्रयत्न करणार आहे.  या महोत्सवासाठी ग्रामस्थांकडून केलेले सहकार्य बहुमूल्य आहे. जिल्हास्तरावर  प्रथम तीन क्रमांक मिळविणार्‍या खेळाडूंना जि.प.मार्फत मोफत विमान प्रवासासह विदेश भ्रमणाची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे असे सांगितले.  लोक सहभागातून आम्ही हा महोत्सव पार पाडत आहोत. विदयार्थ्यांनी  दर्जेदार खेळ करत जिल्ह्यात चमकदार कामगिरी करावी, खेळाबरोबरच शिष्यवृत्ती परीक्षेतही विदयार्थ्यींनी यश संपादन करावे असे आवाहन सभापती सौ. भाग्यलक्ष्मी साटम यांनी केले. 
महोत्सवास जि. प. सदस्यांच्या अनुपस्थितीविषयी माजी उपसभापती संतोष कानडे यांनी खंत व्यक्‍त केली. तालुक्यातील आठ जि.प. सदस्यांपैकी केवळ एक सदस्य महोत्सव उद्घाटनाला उपस्थित होते. अशा स्पर्धामधून अनेक खेळाडू जखमी होतात. मात्र, जखमी खेळाडूंना उपचारासाठी त्याच्या कुटुंबातील व्यक्तींना खर्च करावा लागतो मात्र अशा खेळाडूंना मदत देण्यासाठी विशेष निधीची तरतूद व्हायला हवी असे उपसभापती दिलीप तळेकर यांनी सांगितले. गटविकास अधिकारी मनोज भोसले,प्रकाश पारकर, सौ. सायली सावंत यांनी मनोगत व्यक्‍त केले. प्रास्तविक संदेश किंजवडेकर, सूत्रसंचलन राजेश कदम व आभार रश्मी आंगणे यांनी मानले.