Sun, Aug 25, 2019 19:25होमपेज › Konkan › बिद्रे प्रकरण : खडसेंच्या भाच्याला ४ दिवसांची कोठडी

बिद्रे प्रकरण : खडसेंच्या भाच्याला ४ दिवसांची कोठडी

Published On: Dec 11 2017 4:42PM | Last Updated: Dec 11 2017 5:29PM

बुकमार्क करा

पनवेल  : विक्रम बाबर

पनवेल कोर्टाने राजेश पाटील याला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. कळंबोली येथून बेपत्ता झालेल्या सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे बेपत्ता प्रकरणात त्याला अटक शनिवारी उशिरा(दि.०९) करण्यात आले होते. राजेश पाटील भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा आहे.

अश्विनी बिद्रे यांची बदली 2015 साली कळंबोली पोलिस ठाण्यात झाली होती. मात्र त्या हजर झाल्या नाहीत. तेव्हा राजेश पाटील व अभय कुरुंदकर यांच्यात मोबाइलवर संभाषण झाले होते. त्याच कालावधीत राजेश पाटील हा जळगावहून मुंबईत आल्याचेही निष्पन्नही झाले आहे. यावरुन बिद्रे प्रकरणाशी राजेश पाटील याचा संबध असल्याचा पोलिसांचा संशय आहे.

अश्विनी आणि अभय कुरुंदकर यांच्यातील वादाचे, प्रेमाचे सर्व संवाद अश्विनीने आपल्या संगणकात रेकॉर्ड करुन ठेवले होते. त्यावेळी अभय कुरुंदकर आणि अश्विनीमध्ये सतत वाद होत होते. कुरुंदकरांनी अश्विनी यांच्या पतीला गायब करण्याची धमकीही अनेकदा दिली होती. अश्विनीच्या घरातील मंडळींनी जेव्हा संगणक पाहिला त्यावेळी या गोष्टी उघड झाल्या.  कुरुंदकर यांच्यातील मोबाईल संवादाचे व काही चित्रफितीचे पुरावेही न्यायालयात सादर करण्यात होते. त्यानंतरच कळंबोली पोलिसांनी अभय कुरुंदकर यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. अखेर गेल्या गुरुवारी त्यांना अटक केली आहे.

मोबाईल नेटवर्कवरुन अटक

आश्विनी बिद्रे बेपत्ता झाल्या त्या दिवशी राजेश पाटील आणि आश्विनी बेंद्रे यांच्या मोबाईल टॉवर मध्ये ३ किमी अंतर होते. त्यांच्यात मोबाईल संभाषण देखील झाल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. 
 

वाचा संबंधित बातम्या :

अभय कुरूंदकरना पोलिस ठाण्यात सरकारी जेवण  

अभय कुरुंदकर यांना सात दिवस पोलिस कोठडी(व्हिडिओ)

बिद्रे बेपत्ता प्रकरणात अभय कुरुंदकर अटकेत

अश्‍विनी बिद्रेंचा खून झाल्याचे धागेदोरे