Fri, Mar 22, 2019 01:29
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › ‘सेबी’ हाय हाय...!

‘सेबी’ हाय हाय...!

Published On: Jan 31 2018 12:00AM | Last Updated: Jan 30 2018 11:21PMओरोस : प्रतिनिधी 

‘कोण म्हणतंय देणार नाय...’, ‘पैसा आमच्या हक्काचा...’, ‘सेबी हाय हाय’ अशा विविध घोषणा देत राष्ट्रशक्ती इन्व्हेस्टर्स को-ऑर्डिनेशन कमिटी सिंधुदुर्गच्या नेतृत्वाखाली पॅनकार्ड क्लबच्या गुंतवणूकदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी लाक्षणिक धरणे आंदोलन छेडले.  आ. वैभव नाईक यांनी भेट देऊन आंदोलनास पाठिंबा दिला.
सिंधुदुर्ग राष्ट्रशक्ती इन्व्हेस्टर्स को-ऑर्डिनेशन कमिटीच्या नेतृत्वाखाली पॅनकार्ड क्लब्ज कंपनीच्या गुंतवणूकदार, एजंट आदी या आंदोलनात सहभागी झाले होते. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांमार्फत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना सादर करण्यात आले. संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप उंबळकर, अमित मराठे, सचिन वैद्य, हेमंतकुमार परब, आदित्य पंडित, संतोष सावंत यांच्यासह अनेक गुंतवणूकदार, एजंट आदी उपस्थित होते.

1 जून 1997 रोजी सुरू झालेल्या पॅनकार्ड क्लबमध्ये महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक राज्यांत मिळून 55 लाख गुंतवणूकदार आहेत. महाराष्ट्रात 30 लाख गुंतवणूकदार असून 3 हजार 850 कोटींची गुंतवणूक केलेली आहे. 

ही कंपनी गुंतवणूकदारांचा परतावा नियमित व वेळेत असताना भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्डाने 2014 मध्ये एक मेल पाठवत कंपनीला सर्व व्यवहार थांबविण्याचे आदेश दिले. त्यानंतरही 2015 पर्यंत कंपनीने मुदत संपलेल्या गुंतवणूकदारांना परतावा दिला. मात्र, दरम्यान या विरोधात कंपनी सॅट या न्यायालयात गेली होती. तो निर्णय ‘सेबी’च्या बाजूने लागला. यावेळी पुढील तीन महिन्यांत गुंतवणूकदार यांचे परतावे देण्याचे आदेश दिले. 
या विरोधात कंपनी उच्च न्यायालयात गेली असता न्यायालयानेही तोच निर्णय कायम ठेवला.