Tue, Mar 26, 2019 01:34होमपेज › Konkan › ओझर येथे १५० आंबा कलमे जळाली

ओझर येथे १५० आंबा कलमे जळाली

Published On: Feb 26 2018 1:15AM | Last Updated: Feb 25 2018 9:55PMमालवण : वार्ताहर

कांदळगांव -ओझर हायस्कूल समोरील माळरानाला वीज वाहिन्यांच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागून याठिकाणी असलेली दोन एकर बाग व आंबा बागायतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. ही घटना रविवारी दुपारी 1.30 वा. च्या सुमारास घडली. सुमारे तीन तासाच्या परिश्रामानंतर आग आटोक्यात आणण्यात ग्रामस्थाना यश आले.

ओझर विद्या मंदिर समोरील भागात असलेल्या गवताला दुपारी अचानक आग लागली. वार्‍यामुळे या आगीचा भडका उडाला होता.  परिसरातील सुमारे 100 ते 150 आंबा कलम झाडांची नुकसानी झाली. सुमारे दोन एकर क्षेत्र आगीच्या भक्षस्थानी पडले. यात आंबा उद्योजक आबू नेरकर, श्री.वालावलकर यांच्या बागांचे नुकसान झाले. घटनास्थळी मालवण नगरपालिकेचा अग्‍निशामक बंब बोलावण्यात आला होता. सुमारे तीन तासाच्या अथक प्रयत्नाने आग आटोक्यात आणण्यात आली. उपसरपंच रणजित परब, उदय परब, स्वप्निल राणे,पोलिसपाटील शीतल परब यासह आबू नेरकर व त्यांचे  कामगार यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.