Wed, Sep 26, 2018 14:08होमपेज › Konkan › ...अन्यथा मुख्यमंत्र्यांवर हक्‍कभंग ठराव

...अन्यथा मुख्यमंत्र्यांवर हक्‍कभंग ठराव

Published On: Dec 21 2017 1:52AM | Last Updated: Dec 20 2017 10:30PM

बुकमार्क करा

रत्नागिरी : प्रतिनिधी

राजापूर तालुक्यातील नाणार येथील जागा प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पासाठी खा. विनायक राऊत यांनी सुचवल्याच्या मुख्यमंत्र्यांच्या गौप्यस्फोटानंतर राऊत आक्रमक झाले असून, आपण जागा सुचवल्याचे सिद्ध करा; अन्यथा मुख्यमंत्र्यांवर संसदेत हक्‍कभंग ठराव मांडू, असा इशारा राऊत यांनी दिला आहे.

प्रस्तावित प्रकल्प ग्रीन रिफायनरी असल्याने प्रदूषण होणार नाही. समुद्रातील सजीवसृष्टीवर, तसेच फळबागांवरही त्याचा परिणाम होणार नसल्याचे  सांगून प्रकल्पासाठी उद्योगमंत्री अनंत गीते व खा. विनायक राऊत हे आग्रही होते. त्यामुळेच  हा प्रकल्प आणण्याचे निश्‍चित करण्यात आले, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेले विधान असत्य असल्याचे राऊत म्हणाले.