Mon, May 20, 2019 19:00होमपेज › Konkan › सिंधुदुर्गात केवळ १७ हजार मद्यपी!

सिंधुदुर्गात केवळ १७ हजार मद्यपी!

Published On: Feb 04 2018 11:24PM | Last Updated: Feb 04 2018 10:19PMओरोस : प्रतिनिधी

आरोग्य विभागाने नुकत्याच केलेल्या मौखिक तपासणी मोहिमेत चार जिल्ह्याच्या तुलनेत सिंधदुर्ग जिल्ह्यात दारू पिणार्‍यांची संख्या कमी आहे. एक महिन्याच्या तपासणी मोहिमेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 16 हजार 985 जणांना दारूचे व्यसन असल्याचे पुढे आले आहे. सिंधुदुर्गसह रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली या चार जिल्ह्यात तब्बल 1 लाख 56 हजार 812 जणांनी स्वतः मद्य प्रशान करीत असल्याचे सांगितले आहे. 

सिंधुदुर्ग जिल्हा दारू पिण्यात कोल्हापूर विभागात चौथ्या क्रमांकावर तर रत्नागिरी तिसर्‍या क्रमांकावर आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 31 हजार 164 जण व्यसनाच्या आहारी गेले आहेत.  कोल्हापूर जिल्हा पहिल्या क्रमांकावर असून तिथे 68 हजार 963 तर सांगली जिल्हा दुसर्‍या क्रमांकावर आहे. तिथे 39 हजार आठशे जन या व्यसनांच्या आहारी गेले असल्याचे आरोग्य प्रशासनाने आपल्या सर्व्हेच्या अहवालानुसार जाहीर केले आहे. 

मौखिक सर्व्हेक्षण सर्व्हेत इतके मद्यपी सापडले, तर व्यापक प्रमाणात सर्व्हे झाल्यास ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. आरोग्य प्रशासाने प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, तालुका रूग्णालय, जिल्हा रूग्णालयातील तोंडाच्या आजारासंबंधी मोहिम राबविण्यात आली. एका महिन्याच्या मोहिमेत एवढे व्यसनाच्या आहारी गेलेले आढळले. परिणामी तोंड आणि पोटाचे विकारग्रस्तांची   संख्या वाढत असल्याचा आरोग्य प्रशासनाचा दावा आहे.