Fri, Jul 19, 2019 01:22होमपेज › Konkan › कुंभार समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष!

कुंभार समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष!

Published On: Dec 16 2017 1:44AM | Last Updated: Dec 15 2017 9:21PM

बुकमार्क करा

ओरोस : प्रतिनिधी

कुंभार समाजाच्या प्रलंबित मागण्या सोडविण्याचे आश्‍वासन भाजपाच्या नेत्यांनी दिले होते. परंतु सत्ता येवून दोन वर्षे उलटली तरी अद्याप कुंभार समाजाच्या न्याय मागण्या मंजूर झालेल्या नाहीत. याप्रश्‍नी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कुंभार समाज बांधवांनी शुक्रवारी जिल्हाधिकार्‍यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले. या न्याय मागण्या शासनस्तरावर पोहोचविण्याचे आश्‍वासन निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी यांनी दिले.

याबाबत संघटनेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप सत्तेत आल्यास कुंभार समाजाच्या प्रलंबित मागण्या त्वरित सोडविण्यात येतील असे आश्‍वासन 2014 मध्ये दिले होते.  त्यानंतर भाजप सत्तेत येवून 3 वर्षे झाली तरी  समाजाच्या न्याय मागण्या मंजूर झालेल्या नाहीत. शासन व मुख्यमंत्र्यांना त्यांच्या आश्‍वासनाची  आठवण करून देण्यासाठी  15  डिसेंबर रोजी  समाज बांधवांनी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात धरणे आंदोलन छेडत, समाजाच्या भावना मुख्यमंत्र्यांकडे पाहोचविण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदन सादर केले.   कुंभार समाजाचे जिल्हाध्यक्ष डॉ. सत्यवान नाटळकर आणि कुंभार समाज महासंघाचे उपाध्यक्ष विलास गुडेकर यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकार्‍यांना हे निवेदन देण्यात आले. उपाध्यक्ष सुहास गोठणकर, माजी कार्याध्यक्ष सा. बा. पाटकर, मालवण-कुंभारमाठ  सरपंच प्रमोद भोगावकर, मनोज वाटेगावकर, सिध्दांत  भोगावकर, मालवण तालुकाध्यक्ष  दिलीप सांगवेकर, उदय भोगावकर, हरी चिंदरकर, विलास पुजारे, सावंतवाडी तालुकाध्यक्ष काशिनाथ तेंडोलकर, अनिल निगवेकर, समीर नांदगांवकर, वैभववाडी तालुकाध्यक्ष रवी सांगवेकर, संदेश तुळसुलकर, सतीश चिंदरकर, राजन पिकुळकर, जगन्नाथ पेडणेकर आदी उपस्थित होते.

­­­