होमपेज › Konkan › गुन्हेगारी घटनांमध्ये ६ टक्के वाढ!

गुन्हेगारी घटनांमध्ये ६ टक्के वाढ!

Published On: Mar 01 2018 1:36AM | Last Updated: Feb 28 2018 10:44PMओरोस : प्रतिनीधी 

मागील वर्षांच्या तुलनेत सिंधुदुर्ग  जिल्ह्यात गुन्हेगारी घटनांमध्ये थोडी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. चोर्‍या घरफोड्या आदी  घटनासह वाहतूक आणी  चोरटी दारू वाहतूक व विक्रीच्या घटनामध्ये चौपट वाढ झाल्याचे  समोर आले आहे. मागील वर्षात चोरट्या  दारू वाहतुकीचे व विक्रीचे 198 गुन्हे व 227 संशयितांवर अटकेची कारवाई करण्यात आली होती. या वर्षात हेच प्रमाण फार मोठे असून 718 गुन्हे दाखल झाले आहेत. तर 768 संशयितांविरोधात अटकेची कारवाई करण्यात आली आहे व चार कोटी रुपयांचा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला, अशी माहिती  जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी दिली.साधारणपणे 2016 च्या तुलनेत 2017 मध्ये गुन्ह्यांच्या प्रमाणात  सहा टक्के वाढ झाली आहे.

पोलिस दलाने गुन्हेगारी कारवायांवर विशेष लक्ष दिले आहे.त्यामुळे गुन्हेगारी कारवायांचा आकडा चढता असला तरी त्यातील शाबित होण्याचे प्रमाण व कारवाया करण्याचे प्रमाण पोलिस दलाने वाढविले आहे. गोवा बनावटीच्या दारूसह अनैतिक व अवैध धंद्यांविरोधात पोलीस दलाने मोहीम राबविली होती. व कारवाया केल्या होत्या. आणि त्यातूनच या घटनांमध्ये व अशा कारवायांमध्ये वाढ झाल्याचे समोर आले आहे. असेही जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी स्पष्ट केले.

 जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण हे काही प्रमाणात वाढले आहे. सन 2016 या वर्षांत 868 गुन्हे पोलीस दप्तरी नोंद झाले होते. तर 2017 मध्ये गुन्ह्याचा आकडा 900 च्या आसपास पोचला आहे.  असे असले तरी गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपींना अटक करून गुन्ह्याची उकल करण्यास आम्हाला यश आले आहे. आंबोली,बांदा येथील झालेले खुन प्रकरणाचा छडा लावून आरोपीपर्यंत पोचण्यास पोलिस दलाला यश मिळाले होते. परिणामी 2016 मध्ये गुन्हे उकल होण्याचे प्रमाण 24.39 वरून 2017 मध्ये  31.86 टक्यावर पोचले.मागील वर्षी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रतिबंधक कारवाया मोठ्या प्रमाणात करण्यात आल्या होत्या, तसेच गंभीर प्रकरणातील दोन आरोपींना तडीपार करण्यात आले होते अशी माहिती पोलीस अधीक्षक गेडाम यांनी दिली. 

2017 मध्ये अवैध धंदे, दारू वाहतुक या प्रकरणी 3 कोटी 97 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी 718 जणांवर गुन्हा दाखल असून 768 आरोपींना अटक करण्यात आली आहे. सन 2016 मध्ये 198 गुन्हे दाखल करण्यात आले होते 227 आरोपींना अटक करून 1 कोटी 66 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. गतवर्षी जुगार अड्यांवर छापे मारून 144 गुन्हे दाखल करण्यात आले होते, तर याप्रकरणी 286 आरोपींना अटक करून 24 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. दारू पिऊन वाहन चालविल्यांवर पोलीस दलाने कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. गतवर्षी 25533 केसेस दाखल करून सुमारे 60 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांनी दिली. 

पोलीस आणि जनता यांच्यातील संबंध आणखीन चांगले करण्यासाठी व जनते पर्यंत जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या मार्गी लावल्या जाणार आहेत. तशी नवीन योजना सुरू केली जाणार असून पोलीस उपविभागीय अधिकारी, पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक या दर्जाचे अधिकारी थेट जनतेपर्यंत जावून त्याच्याशी संवाद साधणार आहेत. अशी माहिती गेडाम यांनी दिली.