Sat, Feb 23, 2019 14:24होमपेज › Konkan › सिंधुदुर्गनगरी येथे आंतरराष्ट्रीय योगदिन

सिंधुदुर्गनगरी येथे आंतरराष्ट्रीय योगदिन

Published On: Jun 21 2018 10:56PM | Last Updated: Jun 21 2018 8:50PMओरोस : प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त गुरुवारी येथील क्रीडा संकुलामध्ये योगांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक शिरीष लवंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे तसेच जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी उपस्थितांना योगाचे महत्व सांगितले. योग रोजच्या जीवनात महत्त्वाचा असल्याचे सांगून ते  म्हणाले, प्रत्येकाने निरोगी राहण्यासाठी वेळात वेळ काढून योग करणे गरजेचे आहे.  डॉ. पांढरपट्टे यांनी उपस्थितांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

योग प्रशिक्षक साधना गुरव यांनी योगासनांची  विविध प्रात्यक्षिके दाखवली व मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी उत्तानपादासन, अर्धहालासन, पवनमुक्तासन, भूजंगासन, शलभासन, मकरासन, भद्रासन, दण्डासन, उत्तानमण्डुकासन, वक्रासन, शशांकासन, वज्रासन, अर्धउष्ट्रासन, ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, अर्धचंक्रासन, त्रिकोणासन आदी आसनांचे प्रात्यक्षिक दाखविले.