Tue, Jan 22, 2019 18:45होमपेज › Konkan › होळी उत्सवास 12 ठिकाणी बंदी

होळी उत्सवास 12 ठिकाणी बंदी

Published On: Mar 01 2018 1:36AM | Last Updated: Feb 28 2018 10:55PMओरोस : प्रतिनिधी

 1 मार्चपासून 501 ठिकाणी सार्वजनिक तर 63 ठिकाणी खासगी होळी उत्सव साजरे होणार असून अंतर्गत मानपानामुळे जिल्ह्यात 12 ठिकाणी बंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. पाच आणि सात दिवसाचा हा होळी उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा होतो. होळी कार्यक्रमानंतर मांडावरील रोंबाट, खेळ आणि रंगपंचमीसारखे विविध पारंपरिक कार्यक्रम साजरे होतात.

बंदी लागू असलेली गावे

दोडामार्ग पोलिस क्षेत्रात साटेली-भेडशी, तळेखोल, कसई, बांदा पोलिस क्षेत्रात कास, कुडाळ पोलिस क्षेत्रातील जांभवडे भुतवड, माणगाव, वैभववाडी पोलिस क्षेत्रातील कोकीसरे, कुर्ली, कणकवली पोलिस क्षेत्रातील हुंबरठ, वेंगुर्ले पोलिस क्षेत्रातील होडावडे, विजयदुर्ग पोलिस दूरक्षेत्रातील मणचे अशा 12 ठिकाणी अद्याप 144 कलम लागू करण्यात आले आहे.