Wed, Jul 24, 2019 08:19होमपेज › Konkan › १७ हजार शेतकर्‍यांना ३५ कोटीची कर्जमाफी

१७ हजार शेतकर्‍यांना ३५ कोटीची कर्जमाफी

Published On: Dec 13 2017 1:55AM | Last Updated: Dec 12 2017 11:33PM

बुकमार्क करा

ओरोस ः प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात  राज्यातील ऐतिहासिक कर्जमाफी अंतर्गत जिल्ह्यातील 17 हजार 863 शेतकर्‍यांना 35 कोटी 92 लाख 40 हजार 2 रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील 15 हजार 435 लाभार्थींना 26 कोटी 25 लाख 17 हजार 787 रुपये रकमेचा लाभ तर विविध बँकामधील 2428 लाभार्थांना 9 कोटी 67 लाख 22 हजार 215 रुपये रकमेचा लाभ मिळाला आहे.

राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली या योजने अंतर्गत थकबाकीदार शेतक-यांना त्यांचे थकीत खाते पुर्ववत करण्यासाठी व ज्या शेतकर्‍यांनी आपले खाते नियमित ठेवले आहे. अशा शेतक-यांना प्रोत्साहनपर रक्कम म्हणून मदत केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी चालू असून सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस 7 डिसेंबर 2017 रोजी पर्यंत प्राप्त झालेल्या ग्रीन लिस्ट नुसार 4 हजार 18 थकबाकीदार  शेतकर्‍यांना 11 कोटी 43 लाख 15 हजार 742 इतकी रक्कम तर 11 हजार 417 शेतकर्‍यांना प्रोत्साहनपर लाभ योजनेंअतर्गत 14 कोटी 82 लाख 2 हजार 45 अशी एकूण 15 हजार 435 लाभार्थ्यांना 26 कोटी 25 लाख 17 हजार 787 इतक्या रकमेचा लाभ देण्यात आला आहे.

बँक ऑफ इंडिया कर्ज माफीस पात्र लाभार्थी 746 रक्कम 3 कोटी 42 लाख 15 हजार रुपये, प्रोत्साहनपर लाभार्थी 812 रक्कम 2 कोटी 16 लाख 45 हजार, बँक ऑफ महाराष्ट्र 46 लाभार्थी रक्कम 29 लाख 28 हजार रुपये, सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया 18 लाभार्थी रक्कम 9 लाख 1 हजार रुपये, कॉर्पोरेशन बँक प्रोत्साहनपर लाभाचे लाभार्थी 37  रक्कम 4 लाख 15 हजार रुपये, स्टेट बँक ऑफ इंडिया 59 लाभार्थी रक्कम 32 लाख 98 हजार 730 रुपये, देना बँक प्रोत्साहनपर 26 लाभार्थी रक्कम 8 लाख 45 हजार रुपये, सिंडीकेट बँक 19 लाभार्थी रक्कम 7 लाख 71 हजार रुपये व प्रोत्साहनपर लाभार्थी 7 रक्कम 95 हजार रुपये, युको बँक प्रोत्साहनपर 8 लाभार्थी रक्कम 1 लाख 45 हजार रुपये, युनिअन बँक ऑफ इंडिया कर्जमाफीस पात्र लाभार्थी 48 रक्कम 13 लाख 6 हजार रुपये व प्रोत्साहनपर लाभार्थी 210 रक्कम 47 लाख 32 हजार रुपये, विदर्भ कोकण ग्रामीण बँक कर्जमाफीस पात्र लाभार्थी 360 रक्कम 2 कोटी 49 लाख 80 हजार 485 रुपये व प्रोत्साहनपर 32 लाभार्थी रक्कम 4 लाख 45 हजार.

दिनांक 07 डिसेंबर 2017 च्या शासन निर्णयानुसार मुद्दल व व्याजासह 1 लाख 50 हजार रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकर्‍यांसाठी एक वेळ समझोता योजना (जढड) जाहीर करण्यात आली आहे.  पात्र शेतक-यांनी त्यांच्या हिश्श्याची 1 लाख 50 हजारांपेक्षा जास्त असलेली  संपूर्ण रक्कम 31 मार्च 2018 पर्यंत बँकेत जमा केल्यावर शासनातर्फे 1 लाख 50 हजार रुपये लाभांची रक्कम शेतक-यांना संबंधित बँकामार्फत अदा करण्यात येणार आहे. तरी सदरच्या वाढीव मुदतीचा लाभ घेऊन एक वेळ समझोता योजना अंतर्गत येणा-या शेतकर्‍यांनी आपल्या हिश्श्यांची रक्कम लवकरात लवकर भरुन 1 लाख 50 हजार रुपया पर्यंतचा कर्जमाफीचा लाभ घ्यावा असे आवाहन  मेधा वाके जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सिंधुदुर्ग यांनी कळविले 
आहे.