Sat, Jul 20, 2019 08:34होमपेज › Konkan › राणीबेन्‍नूर येथील अपघातात कुडाळचे व्यावसायिक ठार

राणीबेन्‍नूर येथील अपघातात कुडाळचे व्यावसायिक ठार

Published On: Mar 25 2018 1:49AM | Last Updated: Mar 24 2018 11:49PMकुडाळ : प्रतिनिधी

कुडाळ शहरातील व्यावसायिक शैलेश श्याम तिरोडकर (वय 46) यांच्या कारची हुबळीपासून 120 कि.मी. अंतरावर राणीबेन्‍नूर येथे शुक्रवारी रात्री उभ्या असलेल्या ट्रकला धडक बसली. या भीषण धडकेत गंभीर जखमी झालेल्या शैलेश तिरोडकर यांचा मृत्यू झाला. 

कुडाळ पिंगुळी सराफदारवाडी येथे ते आपल्या कुटुंबासमवेत राहत असत. कर्नाटकमधील प्रसिद्ध अशा शृंगेरी मठातील कार्यक्रमासाठी ते  कारने  शुक्रवारी दुपारी  कुडाळमधून मार्गस्थ झाले. त्यांच्यासोबत स्वामी दत्तानंद (सतीश सदानंद प्रभू), चंद्रशेखर पुनाळेकर होते. दरम्यान, शैलेश यांची कार मागाहून का येत नाही? यासाठी अशोक प्रभू यांनी   फोनवरून संपर्क साधला असता शैलेश यांच्या कारला अपघात झाल्याचे समजताच अशोक प्रभू माघारी परतले. अपघातात कारच्या दर्शनी भागाचा चक्‍काचूर झाला.

 

Tags : Kudal, Kudal news, accident, one killed,