होमपेज › Konkan › हर्णै येथे हाणामारीत एकाचा मृत्यू

हर्णै येथे हाणामारीत एकाचा मृत्यू

Published On: Aug 19 2018 1:31AM | Last Updated: Aug 18 2018 9:16PMदापोली : वार्ताहर

हर्णै बाजारमोहल्‍ला येथे शनिवारी दोन कुटुंबांत झालेल्या हाणामारीमध्ये एकाचा मृत्यू झाला. या घटनेबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. इम्तियाज मेमन असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. 

याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हर्णै बाजारमोहल्‍ला येथे राहणारे इम्तियाज रज्जाक मेमन (वय 42) याच्या विरोधात माजीद महालदार यांनी किरकोळ स्वरूपाची दापोली पोलिस ठाण्यात दि. 18 ऑगस्ट रोजी तक्रार दिली होती. तसेच दि. 17 ऑगस्ट रोजी माजीद महालदार याच्या विरोधात इम्तियाज  मेमन याने पत्नीचा विनयभंग केल्याची तक्रार दाखल केली होती. परस्पर विरोधी तक्रारीनंतर दि. 18 रोजी इम्तियाज मेमन याने माजीद महालदार यांच्या डोक्यावर सुर्‍याने वार केले. या भांडणात मध्ये पडलेल्या इम्रान माखजनकर यांनाही  इम्तियाज मेमन याने धक्‍काबुक्‍की केली. यावेळी इम्तियाज मेमन याच्यावरही वार झाला. त्यामुळे  गंभीर असलेल्या इम्तियाज मेमन यांचा रूग्णालयात आणण्यापूर्वी मृत्यू ओढवला.  याबाबत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही दापोली पोलिसांकडून सुरू आहे.