Sat, Sep 22, 2018 23:18होमपेज › Konkan › बाणकोटनजीक दुचाकीला अपघात; कोतवालाचा मृत्यू

बाणकोटनजीक दुचाकीला अपघात; कोतवालाचा मृत्यू

Published On: Jan 08 2018 1:14AM | Last Updated: Jan 07 2018 11:17PM

बुकमार्क करा

मंडणगड : प्रतिनिधी

तालुक्यातील पंदेरी तलाठी सजाचे कोतवाल महेश मोतिराम पालकर (26, रा. पंदेरी -सोनारवाडी) यांचा बाणकोट रोडनजीक दुचाकी अपघातात मृत्यू झाला. हा अपघात दि. 6 रोजी मध्यरात्री झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.  या घटनेसंदर्भात विकास विष्णू चिंचघरकर (36, रा. भिंगळोली) यांनी मंडणगड पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार  ते हे रविवारी (दि. 7) मॉर्निंग वॉकला गेले होते.

याच दरम्यान सव्वासात वाजण्याच्या सुमारास बाणकोट रोड येथील काटे बोअरवाले या दुकानाच्या शेजारी मार्गाच्या खालील बाजूस दुचाकी व पंदेरी तलाठी सजाचे कोतवाल   महेश पालकर हे पडलेल्या अवस्थेत आढळले. महेश पालकर यांचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने अपघाती मृत्यू झाल्याची नोंद पोलिसांत करण्यात आली 
आहे.