Fri, Aug 23, 2019 22:14होमपेज › Konkan › रत्नागिरी : गाळ उपसताना विहिरीत गुदमरून कामगाराचा मृत्यू

रत्नागिरी : गाळ उपसताना विहिरीत गुदमरून कामगाराचा मृत्यू

Published On: Jun 01 2018 11:01PM | Last Updated: Jun 01 2018 10:45PMरत्नागिरी ः प्रतिनिधी

अरुंद विहिरीतील गाळ उपसताना श्‍वास गुदमरून कामगाराचा मृत्यू झाला. ही दुर्घटना शुक्रवारी 1 जून रोजी सकाळी 10 वा. सुमारास तालुक्यातील हातखंबा येथे घडली. 

दिनेश गोविंद डांगे (43, रा. हातखंबा, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी दिनेश डांगे हे विहिरीतील गाळ उपसण्याचे काम करत होते. ते काम करत असलेली विहीर अरुंद व खोल असल्यामुळे त्यांचा श्‍वास गुदमरल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, दिनेश हे बराच वेळ विहिरीबाहेर न आल्याने त्यांचा भाऊ राजेंद्र डांगे याने  विहिरीत जाऊन पाहिले असता ते बेशुद्धावस्थेत पडलेले आढळले. त्याने तातडीने दिनेश डांगे  यांना रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी केले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिनेश डांगे यांना तपासून मृत घोषित केले.
याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.