Mon, Aug 26, 2019 10:15होमपेज › Konkan › राजापुरात चिमुरडीवर वृद्धाकडून अत्याचार

राजापुरात चिमुरडीवर वृद्धाकडून अत्याचार

Published On: Mar 19 2019 1:28AM | Last Updated: Mar 18 2019 10:33PM
राजापूर : वार्ताहर

तालुक्यातील नाटे सागरी पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात पोलिस ठाण्यापासून काही अंतरावर असलेल्या एका गावात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. अंगणात खेळत असणार्‍या पाच वर्षांच्या चिमुरडीवर एका 72 वर्षांच्या वृद्धाने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे. 

पोलिसांनी या नराधम वृद्धाला जेरबंद केले असून त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची कारागृहामध्ये रवानगी केली आहे. या घटनेबाबत या परिसरात तीव्र संताप व्यक्‍त होत आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार पाच वर्षांची चिमुरडी शेजारी खेळायला गेली होती. 

सायंकाळी ती घरी आली असता तिला त्रास होत असल्याचे पाहून आजीने विचारणा केली असता शेजारच्या आजोबांनी केलेले घाणेरडा प्रकार मुलीने सांगितला. संतप्त झालेल्या कुटुंबियांनी या प्रकारचा जाब विचारण्यासाठी गेले असता आपण काहीच केले नाही असा पवित्रा त्या व्यक्तीने घेतला. संतप्त पालकांनी संयम राखत थेट नाटे पोलीस ठाणे गाठल. याप्रकरणी त्या वृध्दाच्या विरोधात तक्रार केली. 

या घटनेचे गांभीर्य ओळखत नाटे पोलीसानीही तत्काळ करवाई करीत रात्री बारा वाजताच वृद्धाला ताब्यात घेतले. या वृध्दाच्या विरोधात बाललैगिंक प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची कारागृहामध्ये रवानगी केली आहे.