Sat, Jul 20, 2019 22:11होमपेज › Konkan › राज्यात आता 'ओजस' शाळा, आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण 

राज्यात आता 'ओजस' शाळा, आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण 

Published On: Jan 05 2018 6:20PM | Last Updated: Jan 05 2018 5:53PM

बुकमार्क करा
कर्जत : प्रतिनिधी

राज्यातील  प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण ‘ओजस’ नावाने सुरू होणार्‍या शाळांमध्ये हे शिक्षण मिळणार आहे. 

राज्यातील शाळांचा दर्जा वाढवा व शिक्षणाचा दर्जा उच्च पद्धतीचा असावा यासाठी या प्रकारचे शिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी प्राथमिक शाळेपासून म्‍हणजेच दुसरीच्या वर्गापासून हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ स्‍थापन करण्यात येणार आहे. यासाठी राज्याचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी २ जानेवारी रोजी तसा जीआर प्रसिध्द करण्यात आला आहे.

राज्यातील शैक्षणीक धोरणामध्ये राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना महत्वपूर्ण बदल करण्यासाठी प्रयत्‍नशील असतात. यावेळी त्‍यांनी ओजस शाळेचा निर्णय घेतला आहे. याबाबत प्रधान सचिव यांनी माहिती दिली आहे. यामध्ये राज्याच्या शाळांमधून आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

राज्यातील काही खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. तिथे काही वर्षापूर्वीच केंब्रीज किंवा इतर काही आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचा अभ्यास सुरू करण्यात आला आहे, मात्र आता राज्यातील शासनाच्या मराठी शाळांदेखील आंतरराष्ट्रीय करण्यात येणार आहेत. याप्रमाणे इंग्रजी, उर्दू, गुजराती, तेलगु, कन्नड व तामीळ या भाषातील शाळांमधून हा बदल करण्यात येणार आहे.

याबाबत शासनाने दि. १४ ऑक्टोबर, २०१६ रोजी आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जाच्या शंभर शाळा राज्यात पहिल्या टप्प्यात निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार दि.३० नोव्हेंबर, २०१७ नुसार आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जाच्या शाळा निर्माण करण्यासाठी निकष पण निश्चित करण्यात आले आहेत.

प्रथम १० ‘ओजस’ शाळांची निर्मिती 

राज्यात आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जाच्या शंभर शाळा निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये पहिल्या टप्प्यात राज्यात आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जाच्या शाळा किती असतील याचे उत्तम उदाहरण राज्यासमोर ठेवण्यात येणार आहे. यासाठी सुरूवातीला अशा १० आंतरराष्ट्रीय शाळा निर्मिती करण्यात येणार असून या शाळा प्रत्येक विभागांमध्ये निर्माण करण्यात येणार आहेत. या शाळा त्या विभागासाठी मार्गदर्शक म्हणून काम करतील. या शाळांना ‘ओजस’ शाळा असे संबोधण्यात येणार आहे.