Mon, Aug 19, 2019 18:35होमपेज › Konkan › आरक्षण दिल्यास शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण कमी होईल : राणे (video)

मराठ्यांनी तिसरा डोळा उघडला तर सरकारला भारी पडेल : नितेश राणे (video)

Published On: Feb 16 2018 4:12PM | Last Updated: Feb 16 2018 4:27PMबदलापूर : प्रतिनिधी

मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात राज्य शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा. तसेच मराठा समाजाचा अंत पाहू नये. मराठा समाजाने तिसरा डोळा उघडला तर सरकारला भारी पडेल. राज्य सरकारने मराठा आरक्षण लवकर जाहीर न केल्यास सरकार विरोधात टोकाची भूमिका घेण्याचा इशारा आमदार नितेश राणे यांनी बदलापुरात दिला. बदलापुरात मराठा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या वेळी नितेश राणे महोत्सवाला भेट देण्यासाठी आले होते त्यावेळी ते बोलत होते.

मराठा क्रांती मोर्चा ने राज्यभरात विविध मोर्चे काढले. मुंबईतील मोर्चाला चार महिन्यांहून अधिकचा कार्यकाल लोटला आहे दिलेल्या लेखी आश्वासनावर मराठा समाजाला आरक्षण जाहीर करावे अन्यथा समाजात असलेला असंतोष रस्त्यांवर उतरून व्यक्त करण्याचा इशारा नितेश राणे यांनी दिला. पक्ष आणि राजकारण बाजूला ठेवून समाजासाठी टोकाची भूमिका घेण्याची आपली तयारी असल्याचे नितेश राणे म्हणाले.मराठा समाजाला तसेच धनगर समाजाला आरक्षण दिल्यास शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण कमी होतील असा दावाही नितेश राणे यांनी केला. 

कारण राज्यातील 90 टक्के शेतकरी हा मराठा बहुजन समाजातून येतो या समाजाला आरक्षण दिल्यास घरातील एका व्यक्तिला नोकरी मिळाल्यास त्या घराचा प्रपंच सुरू राहू शकतो. सध्याची शेती बेभरवशाचीच झाले आहे तसेच निसर्ग हा कोणाच्याही आवाक्यात राहिला नसल्याने शेती उत्पादनातून फायदा न झाल्यास शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येणार नाही त्यासाठी आरक्षण गरजेचे असून मराठा समाजातील शेतकऱ्यांना आरक्षण मिळाल्यास घरातील एक व्यक्ति नोकरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकते त्यामुळे राज्य शासनाने मराठा समाजाला आरक्षण देताना या मुद्द्याचा विचार करून शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी तरी तातडीने ह्या मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेऊन तो निर्णय जाहीर करण्याची मागणी नितेश राणे यांनी केली. मराठा महोत्सवाला भेट देताना मराठा महोत्सवाचे  कालिदास देशमुख संदीप परब यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर यावेळी उपस्थित होते.