होमपेज › Konkan › मुले व पालकांमधील दरी कमी व्हायला हवी 

मुले व पालकांमधील दरी कमी व्हायला हवी 

Published On: Jan 15 2018 1:42AM | Last Updated: Jan 14 2018 11:53PM

बुकमार्क करा
कासार्डे : वार्ताहर
 

आजच्या पिढीतील मुले घरी व्यक्‍त होत नाहीत, ती अशा कार्यक्रमातून इथे व्यक्‍त होतात. यामुळे ‘एक वचन तुमच्यासाठी’ कार्यक्रम मुले व पालक यांच्यामधील दरी कमी व्हायला मदत करेल, असे प्रतिपादन कणकवली  उपसभापती दिलीप तळेकर यांनी केले. तळेरे येथील श्रावणी कॉम्प्युटरमार्फत नव वर्षाच्या पूर्वसंध्येला मुले व पालक यांच्यासाठी  आयोजित ‘एक वचन तुमच्यासाठी’ या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. श्रावणी कॉम्प्युटरचे संचालक सतीश मदभावे, संचालिका सौ. श्रावणी मदभावे, रिना दुधवडकर, प्रियांका बांदिवडेकर, ग्रा. पं. सदस्य दिनेश मुद्रस, उदय दुधवडकर, अस्मि जोईल, प्रकाश चौगुले, वैदेही ब्रम्हदांडे, अरुण चौगुले, कुंडलिक माने यांच्यासह पालक व मुले उपस्थित होते. 

छोट्या मुलांनी आपल्या संकल्पनेतून टाकाऊपासून तयार केलेल्या विविध टिकाऊ आणि आकर्षक वस्तू आणि नवीन वर्षातील एक वचन आपल्या पाल्यांना दिले. यावेळी काही पाल्यांच्या डोळ्यात नकळत पाणी आले तर काहीजण अक्षरश: निशब्द झाले. यावेळी असमी जोईल, उदय दुधवडकर, यांनी मनोगत व्यक्‍त केले. प्रास्ताविक श्रावणी मदभावे यांनी केले.  अशा उपक्रमाची आज नितांत गरज असून आपण आम्हा पालकांसाठी या उपक्रमाद्वारे एक पाउल पुढे टाकले आहे. यामधून मुले मनमोकळे करतात. पूर्णपणे व्यक्‍त होतात आणि चांगला संवाद होतो. याबद्दल सर्व पालकांच्यावतीने समाधान व्यक्‍त करण्यात आले.