Thu, Nov 15, 2018 07:37होमपेज › Konkan › नाशिकचा पर्यटक बुडाला देवबाग खाडीत 

नाशिकचा पर्यटक बुडाला देवबाग खाडीत 

Published On: Apr 15 2018 2:57PM | Last Updated: Apr 15 2018 2:57PMमालवण : प्रतिनिधी

नाशिकहून पर्यटनासाठी आलेला पर्यटक देवबाग खाडीत बुडाला. घटनेनंतर काही वेळात स्थानिक ग्रामस्थांनी त्‍याला बाहेर काढले.  अविनाश दिलीप दळवी (वय २८) खाडीत बुडालेल्‍या पर्यटकाचे नाव आहे. 

नाशिकहून अक्षय होतकर, सचिन भगत, संकेत फड, सागर कांबळी, गौरव पाटील, बिपिन पॉल्सन हे पर्यटनासाठी आले होते. यातील तिघे जण खाडीपात्रात पोहत होते. पाण्याचा अंदाज न अल्‍याने अविनाश पाण्यात बुडाला. स्‍थानिकांना या घटनेची माहिती मिळाल्‍यानंतर त्‍यांनी अविनाश याला पाण्यातून बाहेर काढले. त्‍यानंतर त्‍याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. ग्रामीण रुग्‍णालयात प्राथमिक उपचार करून त्‍याला अधिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.  

दरम्‍यान, या पर्यटकांना स्‍थानिक ग्रामस्‍थांनी खाडीत न जाण्याच्या सुचना दिल्‍या होत्‍या. मात्र, याकडे दुर्लक्ष करून पर्यटक पोहण्यासाठी खाडीत उपरले. 

Tags : malwan dewbag creek, nashik, tourist