Wed, Jul 17, 2019 10:23होमपेज › Konkan › नारायण राणे आता जिल्हा मर्यादित नेते!

नारायण राणे आता जिल्हा मर्यादित नेते!

Published On: Apr 15 2018 1:33AM | Last Updated: Apr 14 2018 11:26PMसावंतवाडीः प्रतिनिधी

कणकवली. न. पं. निवडणुकीत युतीचा झालेला पराभव हा कार्यकर्त्यांच्या अतिआत्मविश्‍वासाचा परिणाम आहे. आमच्या गाफील कार्यकर्त्यांनीच त्यांना विजयाची संधी मिळवून दिली. कणकवली नगरपंचायत जिंकली यात  खा. नारायण राणेंचे कौतुक कसले. त्यांना राष्ट्रवादी आणि मनसेला बरोबर घ्यावे लागले, खरेतर आता नारायण राणे हे  केवळ सिंधुदुर्ग, कणकवलीपुरते मर्यादित राहिले आहेत, अशी  खरमरीत टीका पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत केली. 

श्रीधर अपार्टमेंट संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, कणकवली नगरपरिषदेच्या विजयाने राणेंचे राजकीय वजन वाढण्याचा प्रश्‍नच येत नाही.  कारण ती नगरपंचायत त्यांच्याच ताब्यात होती. ते जिंकले त्यात मोठे काही नाही. राणेंंनी पुणे अथवा नागपूर जिल्हयात विजय मिळविला असता तर गोष्ट वेगळी होती. खा. राणेंचे कणकवली हे गाव आहे, मग तेथील नगरपंचायत जिंकली म्हणून कौतुक ते कसले? असा खोचक सवाल त्यांनी केला.  

पुढील आठवड्यात जांभेकर स्मारकाचा निर्णय होणार आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जिल्हा मुख्यालयातील स्मारकाच्या निधीसाठी मुख्यमत्र्यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक पुढील आठवड्यात आयोजित केली आहे. त्यामुळे स्मारकाचे काम शीघ्र गतीने सुरू होईल, असा विश्‍वास पालकमंत्री केसरकर यांनी व्यक्त केला. 

जे वैभववाडीत घडले तेच कणकवलीत
कणकवली नगरपरिषदेचा पराभव आम्हाला मान्य आहे. या पराभवामागे मैत्रीपूर्ण लढत कारणीभूत ठरली. जे वैभववाडीत घडले तेच कणकवलीत घडले. कार्यकर्त्यांच्या हट्टापोटी मैत्रीपूर्ण लढती होतात. जर युती झाली तर ती पूर्णपणे व्हायला हवी. मैत्रीपूर्ण लढत झाल्याने त्याचा फटका बसतो. याचाच फटका कणकवली नगरपरिषदेत बसला. या  निवडणुकीची एकत्रित मते पाहिल्यास युतीचा नगराध्यक्ष जिंकला असता, तसेच आणखी तीन- चार नगरसेवक निवडून आले असते, असा दावा ना. केसरकर यांनी केला. यातून कार्यकर्त्यांनी धडा घ्यायला हवा. संदेश पारकर यांनी नव्या जोमाने कामाला लागावे. भविष्यात त्यांच्याकडून चांगले काम अपेक्षित असल्याचे ते म्हणाले.