Thu, Jan 17, 2019 05:55होमपेज › Konkan › ‘राणेंचे मच्छीमारांवरील प्रेम पुतणा मावशीसारखे’

‘राणेंचे मच्छीमारांवरील प्रेम पुतणा मावशीसारखे’

Published On: Feb 18 2018 1:59AM | Last Updated: Feb 18 2018 1:59AMमालवण : प्रतिनिधी

आमदार बनल्यानंतर गेल्या तीन वर्षांत आपण मच्छीमारांचे विविध प्रश्‍न सोडविले आहेत. सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्‍तांची बदली, मत्स्य व्यवसाय कार्यालयाचे स्थलांतर, डिझेल परतावा, मत्स्यजेटी, पर्ससीन मच्छीमारी बंदी, या विषयाची सोडवणूक करताना चांदा ते बांदा योजनेअंतर्गत विविध योजना मच्छीमारांसाठी आणल्या. आता एलईडी मच्छीमारी करणार्‍या गोव्यातील ज्या बोटी पकडण्यात आल्या आहेत,त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी व पकडलेल्या बोटी कायमस्वरूपी अवरुद्ध करण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे, अशी माहिती मालवणचे आ. वैभव नाईक यांनी दिली.राणेंचे मच्छीमारांवरील प्रेम हे पुतणा -मावशीचे प्रेम असल्याची  टीकाही यावेळी त्यांनी केली.  

आ. वैभव नाईक यांनी शनिवारी मालवणला भेट दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.आ.नाईक म्हणाले, एलईडी मच्छीमारी विरोधात स्थानिक मच्छीमारांवर जो गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्या गुन्ह्यात जे खरोखरच होते त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमत्र्यांनी दिल्या आहेत. मच्छीमारांची जी धरपकड होत होती ती आता शिवसेनेमुळे  थांबली आहे. असे सांगून श्री. नाईक म्हणाले, सहा महिन्यांपूर्वी मत्स्यव्यवसाय कार्यालयात बांगडा फेक करणारे त्यानंतर मालवणमध्ये फिरकले नाहीत. तर खासदार असताना निलेश राणेनी खासदारकीच्या काळात कोणते काय  केले? ते जाहीर करावे. 20 फेब्रुवारी रोजी नारायण राणे काढत असलेला मोर्चा हा एलईडी मच्छीमारीच्या विरोधात आहे की शासनाच्या विरोधात आहे हे स्पष्ट करावे. मत्स्यव्यवसाय कार्यालयात जी मच्छीमारांनी कोळंबीफेक केली होती त्या मच्छीमारांच्यावर गुन्हे दाखल झाले होते. मात्र, बांगडाफेक करणार्‍या नितेश राणेंवर गुन्हा का नाही? असा सवाल त्यांनी केला.

मंत्री असताना राणेंनी पर्ससीन सारख्या मच्छीमारीला सक्रिय दिली आणि दुसरीकडे पारांरिक मच्छीमारांना धमक्या देत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे काम केले. मात्र, आता एलईडी सारख्या आधुनिक व अनधिकृत मासेमारी विरोधात लढा पुकारणार्‍या पारंपरिक मच्छीमारांच्या बाजूने असल्याचे राणे दाखवत असून राणेंचे मच्छीमारांवरील प्रेम हे पुतणा मावशीचे प्रेम असल्याची  टीकाही  आ. वैभव नाईक यांनी केली आहे.