Thu, Aug 22, 2019 10:51होमपेज › Konkan › नांदगावमध्ये चौपदरीकरणाचे काम ‘स्वाभिमान’ने बंद पाडले!

नांदगावमध्ये चौपदरीकरणाचे काम ‘स्वाभिमान’ने बंद पाडले!

Published On: May 18 2018 1:17AM | Last Updated: May 17 2018 10:48PMनांदगाव : वार्ताहर

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणामुळे पावसाळ्यात  निर्माण होणार्‍या स्थितीकडे दुर्लक्ष होत असल्याने नांदगावातील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी महामार्गाचे काम गुरुवारी बंद पाडले. यावेळी मागण्यांची पूर्तता ठेकेदाराकडून करण्याचे आश्‍वासन देण्यात आले.

 2 मे रोजी प्रांताधिकारी व महामार्ग चौपदरीकरण ठेकेदार कंपनी के. सी. बिल्डकॉन यांना नांदगाव स्वाभिमान पक्षाच्या वतीने व ग्रामपंचायत कार्यालयाकडून  निवेदन देण्यात आले होते. नांदगाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये रस्ता रुंदीकरणाचे काम केले. के.सी.सी. या कंपनीतर्फे सुरू असून पार्किंग रस्त्यावर खडी व ग्रीड टाकून वाहतुकीस मार्ग खुला केला आहे. या मार्गावर गाड्याची ये-जा होत असताना धुळीचे साम्राज्य पसरत आहे. तसेच अनेक ठिकाणी वाहतूक डायव्हरशन केल्यामुळे दुचाकीस्वार स्लीप होऊन अपघात होत आहेत. कणकवली ते कसाल मार्गावर दिलीप बिल्डकॉन या कंपनीमार्फत  
काम सुरू असून कंपनीने सर्व्हिस रोडला डांबरीकरण टाकून वाहतुकीस खुला केलेला आहे.त्याप्रमाणे खारेपाटण ते कणकवली सर्व्हिस रस्त्याला खडी व ग्रीट ऐवजी डांबर टाकून रस्ता सुरू करावा, अशी मागणी केली आहे.यामुळे या मार्गावर अपघात होण्याचे प्रमाण कमी होईल. तरी सर्व्हिस रस्त्यावर डांबर टाकण्यात यावे व जीवित हानी झाल्यास कंपनी जबाबदार राहील.तसेच नांदगाव पांडुरंग तेली घराजवळ असणारी सार्वजनिक विहीर चौपदरीकरणात बाधित झाली आहे.चौपदरीकरण काम सुरू असताना विहीर कोसळण्याची दाट शक्यता आहे.  विहीर कोसळल्यास 20 ते 25 कुटुंबाचे पाण्यामुळे गैरसोय होणार आहे.तरी विहीर तात्पुरती दुरूस्ती करून मिळावी.तसेच ही सार्वजनिक विहीर रस्ता रुंदीकरणामध्ये जात असल्याने दुसरीकडे बांधूनच मिळावी व नुकसान भरपाई देण्यात यावी अन्यथा    योग्य निर्णय न झाल्यास नांदगाव ग्रामस्थ आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत असे निवेदनात म्हटले होते. 

याच अनुषंगाने आज पंधरा दिवसानतंर महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष नांदगाव व इतर ग्रामस्थ एकत्र होत हायवेचे काम आंदोलन करत बंद पाडले. यावेळी नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर, उपसरपंच निरज मोरये,असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, रविराज मोरजकर,महेश तांबे,भूपेश मोरजकर,श्रीराम मोरजकर,ऋषिकेश मोरजकर,सदा बिडये,अरूण बापर्डेकर,गवस साटविलकर, राजेंद्र पाटील,विठोबा कांदळकर,भूषण म्हसकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी ठेकेदार कंपनीने आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.मागण्याची पूर्तता न झाल्यास कोणत्याही परिस्थितीत काम करू देणार नसल्याचा इशारा  दिला आहे.