Tue, May 21, 2019 00:41होमपेज › Konkan › रिफायनरी हद्दपारीसाठी राणे मैदानात

रिफायनरी हद्दपारीसाठी राणे मैदानात

Published On: Feb 06 2018 1:47AM | Last Updated: Feb 05 2018 10:44PMचिपळूण : प्रमोद पेडणेकर

नाणार येथील प्रस्तावित ग्रीन रिफायनरीला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने कडाडून विरोध केला आहे. पक्षाचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री नारायण राणे स्वत: रिफायनरी हद्दपारीचे नेतृत्व करणार असल्याने प्रकल्प विरोधकांत उत्साह आला आहे.

दि. 8 फेब्रुवारीला सायंकाळी 4 वाजता सागवे (कात्रादेवी) राजापूर येथे नारायण राणे यांची जाहीर सभा होणार असून माजी खासदार नीलेश राणे व काँग्रेसचे कणकवलीचे आ. नीतेश राणे यांची तोफही यावेळी धडाडणार आहे.  राजापूर तालुक्यातील नाणार दशक्रोशीत सुमारे चौदा गावांमध्ये हा रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित आहे.

आमदार नीतेश राणेही व्यासपीठावर

या मेळाव्यात काँग्रेसचे कणकवली-देवगडचे आमदार नीतेश राणे हेही व्यासपीठावर येणार आहेत.  रिफायनरी राजापूरसह देवगड तालुक्यातीलही काही गावात प्रस्तावित असल्याने आपल्या मतदारसंघात रिफायनरीला स्थान नाही, असा इशारा या पूर्वीच त्यांनी दिला आहे.