Sat, Feb 16, 2019 15:47होमपेज › Konkan › काँग्रेस शिष्टमंडळ आजपासून ‘नाणार’च्या दौर्‍यावर

काँग्रेस शिष्टमंडळ आजपासून ‘नाणार’च्या दौर्‍यावर

Published On: Apr 19 2018 1:35AM | Last Updated: Apr 18 2018 9:40PMचिपळूण : खास प्रतिनिधी

नाणार येथील रिफायनरी प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध असल्याच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह शिष्टमंडळ दि. 19 व 20 एप्रिल रोजी प्रकल्पग्रस्तांच्या भेटीला येणार आहे. 

सर्वच राजकीय पक्षांनी नाणारकडे लक्ष केंद्रीत केले आहे. याआधी ‘मनसे’चे अध्यक्ष राज ठाकरे, खा. नारायण राणे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, केंद्रीय मंत्री अनंत गीते, पालकमंत्री रवींद्र वायकर आदी नेत्यांनी या भागाला भेटी दिल्या. आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दौरा करणार आहेत. याशिवाय काँग्रेसचे शिष्टमंडळा भेट देणार आहे. 

यामध्ये प्रवक्‍ते खा. हुसेन दलवाई, माजी खा. डॉ. भालचंद्र मुणगेकर, आ. भाई जगताप, आ. हुस्नबानू खलिफे, माजी आ. रवी पाटील, माणिक जगताप, मधु चव्हाण, सुभाष चव्हाण, माजी आ. रमेश कदम, जिल्हा प्रभारी विश्‍वनाथ पाटील, माजी जिल्हाध्यक्ष रमेश कीर, हरिष रोग्ये, विकास सावंत, सचिन सावंत, राजन भोसले आदी या शिष्टमंडळात आहेत. दि. 19 एप्रिल रोजी दुपारनंतर प्रकल्पबाधित गावांना भेटी देण्यात येणार आहेत. दि. 20 एप्रिल रोजी सकाळी प्रकल्पबाधित गावांमधील लोकांची एक बैठक घेण्यात येणार आहे.