Fri, Aug 23, 2019 21:05होमपेज › Konkan › उध्दव ठाकरेंच्या सभेवर नाणारवासियांचा बहिष्कार

उध्दव ठाकरेंच्या सभेवर नाणारवासियांचा बहिष्कार

Published On: Apr 22 2018 11:43AM | Last Updated: Apr 22 2018 11:43AMमुंबई  : प्रतिनिधी

उद्योग खाते शिवसेनेकडे असल्याने अगोदर उद्योग विभागाने काढलेला अध्यादेश रद्द करा, अन्यथा नाणारमध्ये येऊ नका, अशा शब्दात शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उद्या सोमवारच्या नाणार दौऱ्याला स्थानिकांनी विरोध केला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सोमवारी नाणारला भेट देण्याचे जाहीर केले होते. मात्र, उध्दव ठाकरे यांच्या सभेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय नाणार परिसरातील १७ गावच्या प्रकल्पग्रस्तांनी घेतला आहे. अशोक वालम यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्तांनी हा निर्णय जाहीर केला. उद्योग खाते शिवसेनेकडे असल्याने त्यांनी अगोदर उद्योग विभागाने काढलेला अध्यादेश रद्द करावा, अन्यथा नाणारमध्ये येऊ नये, अशा शब्दात उध्दव ठाकरे यांच्या उद्या सोमवारी होणाऱ्या नाणार दौऱ्याला स्थानिकांनी विरोध दर्शवला आहे. 

उद्योग खात्याने नाणार संदर्भात काढलेला अध्यादेश १५ दिवसात रद्द करण्याचे आश्वासन उध्दव ठाकरे यांनी दिले होते. मात्र, ते अद्यापही पूर्ण न झाल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त करत उद्याच्या सभेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे उद्या सोमवारी स्थानिकांशी चर्चा करुन त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत.  

Tags: nanar project effected, villagers, Boycott,  uddhav thackeray, meeting, rajapur, konkan news