Fri, Jul 19, 2019 07:20होमपेज › Konkan › नाणार जमीन खरेदीच्या संशयास्पद व्यवहाराची चौकशी

नाणार जमीन खरेदीच्या संशयास्पद व्यवहाराची चौकशी

Published On: Jul 17 2018 11:00PM | Last Updated: Jul 17 2018 10:51PMनागपूर : 

रत्नागिरी जिल्ह्यातल्या प्रस्तावित नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्पस्थळी झालेल्या जमीन खरेदीच्या संशयास्पद व्यवहारांची चौकशी केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधान परिषदेत प्रश्‍नोत्तराच्या तासात सांगितले.

नाणार प्रकल्पासंदर्भात काँग्रेसच्या हुस्नबानू खालिफे यांनी तारांकित प्रश्‍न उपस्थित करत, हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली, यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपप्रश्‍न विचारत नाणार प्रकल्पाची कुणकुण लागताच तिथे अनेक व्यापार्‍यांनी केलेले व्यवहार संशयास्पद असून, याबद्दल चौकशीची मागणी केली. नाणार प्रकल्प लादणार नाही, असा पुनरुच्चार करत लोकांना विश्‍वासात घेऊन चर्चेच्या माध्यमातून या प्रकल्पाची पुढची कार्यवाही सुरू केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.