Tue, Jul 16, 2019 11:56होमपेज › Konkan › कोकणसाठी वैद्यकीय महाविद्यालय

कोकणसाठी वैद्यकीय महाविद्यालय

Published On: Jul 17 2018 11:00PM | Last Updated: Jul 17 2018 10:34PMनागपूर : प्रतिनिधी

वैद्यकीय शिक्षण विभागाकडून विदर्भ, मराठवाड्यावर अन्याय होत असल्यावरून विधान परिषदेत गदारोळ सुरू असतानाच कोकणातून वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या आलेल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी कोकण, उस्मानाबादला वैद्यकीय महविद्यालय मंजूर केल्याची घोषणा केली.

मराठवाडा व विदर्भावर होत असलेल्या अन्यायाच्या मुद्द्यावरून विधानपरिषदेत गदारोळ सुरू होता. या गदारोळात कोणीच ऐकूण घ्यायला तयार नव्हते. वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन हे आपल्याला बोलू द्यावे, अशी वारंवार मागणी करत होते. अखेर दस्तुरखुद्द मंत्रीच वेलमध्येे उतरले. त्यापाठोपाठ विरोधकही वेलमध्ये उतरल्याने गदारोळ वाढला.

यावेळी शिवसेनेचे मंत्री रामदास कदम भाजप मंत्र्यांच्या मदतीला धावले. कदम यांनी महाजन यांनी समजूत घालून त्यांच्या जागेवर नेले. त्याचवेळी अचानकपणे कोकणातील आमदारांनी कोकणवर अन्याय होत असल्याने कोकणला वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्याची मागणी केली. त्याचवेळी प्रवीण दरेकर यांनी उभे राहून सरकारने तातडीने कोकणला वैद्यकीय महाविद्याल मंजूर केल्याची घोषणा करावी, असा आग्रह धरला. त्याची  तातडीने  दखल घेत कोकण व उस्मानाबादला वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केल्याची घोषणा केली.