Mon, Jul 06, 2020 09:57होमपेज › Konkan › कणकवली न. पं. निवडणुकीत शहर विकास आघाडीची उडी!

कणकवली न. पं. निवडणुकीत शहर विकास आघाडीची उडी!

Published On: Mar 03 2018 1:48AM | Last Updated: Mar 02 2018 10:59PMकणकवली : शहर वार्ताहर

कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी शहरातील सर्व मानकरी तसेच सर्वच प्रभागातील नागरिक कणकवली विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र आले आहेत. या आघाडीतर्फे स्वबळावर 17 नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडणूक लढविली जाणार आहे. याबाबतची घोषणा   कणकवली विकास आघाडीच्या बैठकीत करण्यात आली. तसेच शहरातील पटकीदेवी मंदिरानजीकच्या कार्यालयाचे उद्घाटन गावातील प्रमुख मानकरी  कृष्णा राणे, सदानंद राणे, प्रकाश राणे आणि अर्जुन राणे यांच्याहस्ते करण्यात आले.  या कार्यक्रमाला कणकवली विकास आघाडीचे लवू पिळणकर, विष्णू उर्फ रमेश राणे, दत्ताराम साटम, विलास राणे, उमेश बुचडे, सदानंद राणे, औदुंबर राणे, गणपत मालंडकर, मारूती राणे, चंदू राणे, संतोष आमडोसकर, शैलेश राणे, संदीप राणे, सुदीप कांबळे, मनोज राणे आणि अजित राणे यांच्यासह नगरसेवक किशोर राणे, माजी नगरसेवक अभय राणे, भाई परब,दादा परब, रवी राणे,शेखर राणे, चारुदत्त साटम, ज्येष्ठ उद्योजक मुरलीधर नाईक, ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, विजय गावकर, नाट्यकर्मी संजय राणे, सामाजिक कार्यकर्ते रमेश राणे, दीपक परब, शिवराम राणे, गणेश काटकर, अर्पिता कांबळे, अरुणा राणे, सायली राणे, अर्पिता बुचडे, रविना राणे, ममता राणे, दीक्षा सावंत, सुवर्णा राणे,सतीश नाईक,भूषण परुळेकर,सुनील पारकर आदी उपस्थित होते. 

डॉ.चंद्रकांत राणे म्हणाले, कणकवली शहरात प्रथमच गाव आघाडीच्या माध्यमातून संपूर्ण समाज एकवटला आहे. शहरातील प्रत्येक मतदार आपला आहे. त्यामुळे सर्वांनाच सामावून घेऊन गाव आघाडीचा विजयरथ पुढे न्यायला हवा.  कुणीही बेसावध राहू नका. शेवटपर्यंत गाव आघाडीशी एकसंध राहा. अशोक करंबेळकर म्हणाले, मागील चार महिन्यापासून गाव आघाडीच्या बैठका होत आहेत. आता कणकवली विकास आघाडीच्या माध्यमातून आपण सर्वजण एकत्र आलो आहोत. आपल्यातील एकजूट अशीच कायम ठेवा. आपण सर्वांनी प्रत्येक दिवशी एक मतदार जरी जोडलात तरी आघाडीचा विजय निश्‍चित आहे. आपली लढाई परिवर्तनासाठी आहे. गेल्या काही वर्षात शहराचा विकास झालेला नाही. त्यामुळे परिवर्तन घडवून आपणा सर्वांना शहराचा विकास करायचा आहे. रमेश राणे यांनीही मार्गदर्शन केले.  प्रास्ताविक सुरेश राणे यांनी केले.