Sun, May 26, 2019 08:34होमपेज › Konkan › संगीत नाट्य स्पर्धा केंद्र रत्नागिरीतच ठेवा

संगीत नाट्य स्पर्धा केंद्र रत्नागिरीतच ठेवा

Published On: Jan 06 2018 1:23AM | Last Updated: Jan 05 2018 11:09PM

बुकमार्क करा
रत्नागिरी : प्रतिनिधी

संगीत  नाट्य स्पर्धेचे केंद्र रत्नागिरीत राहावे, या आग्रही मागणीसाठी गोळप येथील नाट्य रसिक अविनाश काळे यांनी शुक्रवारी समस्त रत्नागिरीतील नाट्यरसिकांचे नेतृत्व करीत जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण केले. या उपोेषणाला रत्नागिरीतील नाट्य संस्थांसह रंगकर्मींनीही पाठिंबा दर्शविला होता. 

सांस्कृतिक संचलनालयाद्वारे यंदाच्या घेण्यात येणार्‍या संगीत नाट्य स्पर्धेत रत्नागिरीतील केंद्राला डावलण्यात आले आहे. ही स्पर्धा कोल्हापूर येथे घेण्याचा घाट शासनाने घातला आहे. संगीत नाट्य स्पर्धांच्या 4 वर्षांच्या कारकिर्दीत तीनवेळा या स्पर्धेत रत्नागिरीने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. असे असतानाही रत्नागिरीतील स्पर्धेचे केंद्र कायम ठेवणे  हा रत्नागिरीकरांचा हक्‍क असल्याचा दावा करीत अविनाश काळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण केले. मात्र, शासनाने हे केंद्र कोल्हापूरला नेण्याचा घाट घातला आहे.

या स्पर्धेसाठी, रत्नागिरी केंद्रच आवश्यक असल्याचा आग्रह धरीत नाट्यरसिकांच्या भावना काळे यांनी उपोषणाद्वारे मांडल्या. या आंदोलनाला रत्नागिरीतील अनेक नाट्य संस्थांसह ज्येष्ठ रंगकर्मींनीही पाठिंबा देताना आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थिती लावली होती.