Tue, Apr 23, 2019 21:33होमपेज › Konkan › रत्नागिरी उपकेंद्राची दुरवस्था

रत्नागिरी उपकेंद्राची दुरवस्था

Published On: Apr 08 2018 10:41PM | Last Updated: Apr 08 2018 10:35PMमुंबई : प्रतिनिधी

कँटिन दुरवस्था, लाद्या उखडलेल्या, पन्‍नासहून अधिक संगणक धूळखात पडलेले, प्राथमिक सुविधांचा अभाव, एका अभ्यासक्रमाची घोषणा आणि शिकवणी दुसर्‍याच अभ्यासक्रमाची असे अनेक प्रश्‍न रत्नागिरी उपकेंद्राची पाहणी केल्यानंतर युवासेनेने उपस्थित केले आहेत.

मुंबई विद्यापीठाच्या कोकणातील विद्यार्थ्यांना प्रशासकीय कामांसाठी आणि प्राध्यापकांना मुंबईत यावे लागत होते. याचा फटका अनेक विद्यार्थ्यांना बसतो. आणि अनेकदा गैरसोय निर्माण होते. त्यामुळे त्या परिसरातील विद्यार्थ्यांना रत्नागिरी येथील उपकेंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी या उपकेेंद्राची निर्मिती केली होती. मात्र, या उपकेंद्राचे सक्षमीकरण करण्याऐवजी विद्यापीठाने कानाडोळा केला आहे.  गेल्या सिनेटच्या सभेत देखील यासंदर्भात तक्रारी केल्या होत्या. विद्यापीठाने शुक्रवारी या केंद्राचे सक्षमीकरण करण्याबाबतची माहिती दिली होती. प्रसारमाध्यमांना विद्यापीठाने दिलेली माहिती ही बंद खोलीत बसून त्या केंद्राची पाहणी न करताच दिली असल्याचा आरोप सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी केला आहे. त्याचप्रमाणे कॅप सेंटरसाठी आवश्यक कोणत्याही उपाययोजना राबविण्यात आलेली नाही. त्याचप्रमाणे याठिकाणी कँटिनची व्यवस्था नसून पाणी देखील उपलब्ध नसल्याची माहिती युवा सेनेचे सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी दिली.