Fri, Jan 18, 2019 07:45होमपेज › Konkan › आंबा, काजू नुकसानीचे पंचनामे करा : महसूलमंत्री

आंबा, काजू नुकसानीचे पंचनामे करा : महसूलमंत्री

Published On: Mar 16 2018 10:54PM | Last Updated: Mar 16 2018 10:54PMमुंबई : प्रतिनिधी

राज्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. कोकणात काही ठिकाणी पाऊस पडून आंबा, काजू उत्पादकांचे नुकसान झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत दिली.

राज्यातील ढगाळ वातावरणामुळे कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकरी प्रामुख्याने अडचणीत आला आहे. नाशिक येथील द्राक्षावरदेखील या ढगाळ वातावरणाचा विपरित परिणाम होणार आहे. पाऊस पडणे किंवा न पडणे हे आपल्या हातात नाही; परंतु बर्‍याच ठिकाणी आंब्याचा मोहर गळायला लागला आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने तातडीने उपाययोजना करून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी केली. या गंभीर विषयावर चर्चा करून निर्णय घ्यावा, अशी सूचना त्यांनी केली. महसूलमंत्री पाटील यांनी कोकणात काही ठिकाणी आंबा व काजू पिकांचे नुकसान होण्यास सुरुवात झाली आहे.