Mon, Aug 19, 2019 09:09होमपेज › Konkan › मुंबई-गोवा महामार्गावर अपघात, दोन जखमी

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात, दोन जखमी

Published On: Apr 27 2018 11:22AM | Last Updated: Apr 27 2018 11:22AMमहाड : प्रतिनिधी

मुंबई-गोवा महामार्गावर महाड शहरानजीक असणार्‍या केंबुर्ली गावाची हद्दीत आज पहाटे पाच वाजता मुंबईहून गोव्याकडे जाणारा टेम्पो पलटी होऊन चालकासह एकजण किरकोळ जखमी झाला. या अपघातानंतर पोलिस घटनास्‍थळी दाखल झाले.

मुंबई-गोवा महामार्गावरून टेम्पो (क्र. एमएच ०७ पी ९९५७) मुंबईहून गोव्‍याकडे जात होता. यावेळी केंबुर्ली गावाच्या हद्दीत टेम्‍पो आला असता रस्‍त्याचा अंदाज न आल्याने महामार्गावर टेम्‍पो पलटी झाला. यामध्ये चालक रोहित भगवान गोवेकरसह  एकजण जखमी झाला आहे.