Wed, Nov 21, 2018 23:32



होमपेज › Konkan › ...तोपर्यंत हायवेचे काम सुरू करण्यास विरोधच 

...तोपर्यंत हायवेचे काम सुरू करण्यास विरोधच 

Published On: Jan 06 2018 1:24AM | Last Updated: Jan 05 2018 10:26PM

बुकमार्क करा




कणकवली : प्रतिनिधी

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात बाधीत होणार्‍या सर्व प्रकल्पग्रस्तांचे समाधान होत नाही तोपर्यंत प्रकल्पाचे काम सुरू करण्यास आपला तीव्र विरोध राहील. प्रकल्पग्रस्तांचे समाधान न करता जबरदस्तीने काम केल्यास जनतेचा उद्रेक होऊ शकतो. त्यातून निर्माण होणार्‍या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्‍नास प्रशासन जबाबदार राहिल असा इशारा आ. नितेश राणे यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदनाद्वारे दिला आहे. 

प्रसिध्दीस दिलेल्या निवदेनात आ. राणे यांनी म्हटले आहे की, महामार्ग चौपदरीकरणाअंतर्गत कणकवली शहरातील उड्डाणपूल व रस्त्यांचे काम संबंधित यंत्रणेमार्फत लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे समजते. कणकवली शहरातील चौपदरीकरणासाठीच्या  जमीन संपादनाचा विषय अद्याप सुटलेला नाही. याबाबत येथील जमीनधारकांनी यापूर्वी अनेक तक्रारी आपल्या कार्यालयाकडे सादर केलेल्या आहेत. त्याप्रमाणे आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर लेखी निवेदन दिले आहे. तरी पण प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांची पूर्तता झालेली नाही. असे असताना कामास सुरूवात करणे अन्यायकारक ठरणार आहे. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून प्रकल्पग्रस्तांचे समाधान न करता काम सुरू करण्यास आपला विरोध आहे, असे आ. नितेश राणे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.